लग्नाला विरोध केल्ल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या

By Admin | Updated: August 26, 2016 22:49 IST2016-08-26T22:49:03+5:302016-08-26T22:49:03+5:30

कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना पळासखेडा काकर (ता. जामनेर) येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

Luigi Yugula's suicide due to opposition to marriage | लग्नाला विरोध केल्ल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या

लग्नाला विरोध केल्ल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.26 -  कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना पळासखेडा काकर (ता. जामनेर) येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सतीष जगदीश रुडे (वय-२२) असे या युवकाचे नाव आहे तर युवती १७ वर्षाची आहे. दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले. दोघांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार रात्री गावामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होता. त्यामध्ये सतीश सहभागी झाला होता. त्यानंतर तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. याच दरम्यान गावातील एक युवतीही बेपत्ता झाल्याचे आढळले.
सतीश आणि युवती यांच्या घरात गल्लीचे अंतर आहे. नातेवाईकाकडून रात्रीच त्यांच्या शोध सुरू झाला. शेवटी २६ दुपारी गावापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावर एका शेतातील विहिरीमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले.

Web Title: Luigi Yugula's suicide due to opposition to marriage