शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लुडो हा खेळ कौशल्याचा की संधीचा?, उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 06:05 IST

Ludo : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी केशव मुळ्ये यांनी लुडो सुप्रीम हे मोबाइल ॲप तयार करणाऱ्या कॅशग्राईल प्रा.लि.वर गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

मुंबई : लुडो हा कौशल्याचा खेळ नसून संधीचा खेळ आहे. ऑनलाइन लुडो हा एक प्रकारचा जुगार आहे, असा दावा करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेतमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी केशव मुळ्ये यांनी लुडो सुप्रीम हे मोबाइल ॲप तयार करणाऱ्या कॅशग्राईल प्रा.लि.वर गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. ही कंपनी जुगाराला प्रोत्साहन देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक (एमपीजी) अधिनियमातील तरतुदी या खेळासाठी लागू होतात. तीन वर्षांची मुलेही हा खेळ जिंकू शकतात. त्यामुळे ताे कौशल्याचा नसून संधीचा खेळ आहे, असे याचिकेत म्हटले आहे.कंपनीवर गुन्हा नोंदवण्यासाठी मुळ्ये यांनी गिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली; परंतु पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी सीआरपीसीअंतर्गत अतिरिक्त मुख्य दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि याबाबत तपास करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे, अशी मागणी केली. मात्र, दंडाधिकारी न्यायालयाने लुडो हा खेळ कौशल्याचा असून संधीचा नाही, असे स्पष्ट केले. दंडाधिकारी न्यायालयाच्या या निर्णयाला मुळ्ये यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.हा खेळ खेळाडू पैशाची पैज लावून खेळू शकतो. मोबाइलवर हा खेळ खेळताना प्रवेश फी भरावी लागते. त्यानंतर जो खेळाडू हा खेळ जिंकतो त्याला अन्य खेळाडूंनी प्रवेश फी म्हणून भरलेली रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. ती रक्कम जिंकणाऱ्या खेळाडूच्या ई-वॉलेटमध्ये जमा करण्यात येते. त्यामुळे हा एक प्रकारे जुगार आहे, असे याचिकेत नमूद  करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयtechnologyतंत्रज्ञानMNSमनसे