लोअर परळमध्ये मद्यधुंद कारचालकाची ३ टॅक्सींना धडक, १ जखमी
By Admin | Updated: November 7, 2015 09:07 IST2015-11-07T09:00:46+5:302015-11-07T09:07:09+5:30
लोअर परेल येथील पॅलेडिअम हॉटेलच्या बाहेर मद्यधुंद कारचालकाने तीन टॅक्सींना धडक देत झालेल्या अपघातात एक परदेशी नागरिक गंभीर जखमी झाला.

लोअर परळमध्ये मद्यधुंद कारचालकाची ३ टॅक्सींना धडक, १ जखमी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - लोअर परेल येथील पॅलेडिअम हॉटेलच्या बाहेर एका कारचालकाने तीन टॅक्सींना धडक देत झालेल्या अपघातात एक परदेशी नागरिक गंभीर जखमी झाला आहे.
शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिनही टॅक्सींचे मोठे नुकसान झाले असून एक परदेशा नागरिकही जखमी झाला, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी कारचालक अनुप पांडे याला ताब्यात घेतले असून तो दारूच्या अमलाखाली होता का याबबात पुढील तपास सुरू आहे.
आरोपी कारचालक अनुप पांडे एका प्रतिष्ठित हॉटेलमधे मोठ्या हुद्द्यावर असल्याची माहिती मिळत असूव हॉटेलमध्ये गेल्या आठवड्यापासून रोज पार्टी सुरु आहेत. पार्टीवरुन घरी परततानाच हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.