लातूरमध्ये १० वर्षांतील नीचांकी पाणी पातळी

By Admin | Updated: July 4, 2016 04:05 IST2016-07-04T04:05:44+5:302016-07-04T04:05:44+5:30

गेल्या १० वर्षांतील नीचांकी पाणी पातळीची नोंद जिल्ह्यातील विहिरींमध्ये नोंदली गेली आहे.

Low level water level in Latur in 10 years | लातूरमध्ये १० वर्षांतील नीचांकी पाणी पातळी

लातूरमध्ये १० वर्षांतील नीचांकी पाणी पातळी


लातूर : गेल्या १० वर्षांतील नीचांकी पाणी पातळीची नोंद जिल्ह्यातील विहिरींमध्ये नोंदली गेली आहे. जिल्ह्यातील ८१७ गावांमध्ये १,३५४ अधिग्रहणे तर २०० गावांमध्ये ३२६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे़ त्यातच जुन्या ऐतिहासिक
विहिरीच्या पाणी पातळीत
किंचितही वाढ झालेली नाही़
दहा वर्षांत पहिल्यांदाच २़६९ मीटरने पाणी पातळीत घट
झाल्याने भर पावसाळ््यात नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ मे २००९ मध्ये
अहमदपूर १०़६०, औसा ११़३६, चाकूर ९़३०, लातूर ९़५४, निलंगा १०़८७, शिरूर अनंतपाळ ११़९०, रेणापूर ८़८५, उदगीर ११़८०, जळकोट ११़५२, देवणी ७़९० या प्रमाणात सरासरी १०़३५ मीटर विहिरींची
पाणी पातळी होती़ त्यात
मागील पाच वर्षांच्या तुलनेत मे २००९ मध्ये -०़४९ मीटरने घट
दिसून आली. मे २००५ मध्ये
अहमदपूर ११़४६, औसा १४़०८, चाकूर ९़१९, लातूर १०़६८, निलंगा ११़५५, शिरूर अनंतपाळ ११़४८, रेणापूर ८़७९, उदगीर ९़४३, जळकोट ९़२८ आणि देवणी तालुक्यातील विहिरींत १०़८९ या प्रमाणात
सरासरी पाणी पातळी
होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Low level water level in Latur in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.