फेसबुकवरील प्रेमाचा तरुणीकडून इन्कार

By Admin | Updated: July 25, 2016 02:21 IST2016-07-25T02:21:13+5:302016-07-25T02:21:13+5:30

दोन वर्षापूर्वी फेसबुकवरील प्रेमाचा स्वीकार करुन विवाहाला तयार झालेल्या तरुणीने जेव्हा तो तरुण कतारमधील नोकरी सोडून पुण्यात आला़ तेव्हा मात्र, त्याला नकार देऊन दुसऱ्या तरुणाबरोबर

The love story of Facebook denied | फेसबुकवरील प्रेमाचा तरुणीकडून इन्कार

फेसबुकवरील प्रेमाचा तरुणीकडून इन्कार

पुणे : दोन वर्षापूर्वी फेसबुकवरील प्रेमाचा स्वीकार करुन विवाहाला तयार झालेल्या तरुणीने जेव्हा तो तरुण कतारमधील नोकरी सोडून पुण्यात आला़ तेव्हा मात्र, त्याला नकार देऊन दुसऱ्या तरुणाबरोबर आपले लग्न ठरल्याचे सांगितल्यावर त्याला धक्काच बसला़ त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिला रस्त्यात आडवून बराच वेळ थांबवून
ठेवले. तिला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीला त्रास देऊ लागला. डेक्कन पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या.
अ‍ॅन्टो कॅरल लिज्यु (वय २५, रा. केरळ, सध्या-भोसरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत २३ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षापूर्वी अ‍ॅन्टो सोबत या युवतीची फेसबुकवरून ओळख झाली. अ‍ॅन्टो हा कतारमध्ये एका कंपनीत असिस्टंट एचआर म्हणून नोकरीला होता. युवतीशी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर त्यांच्यात संभाषण वाढले. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अ‍ॅन्टोचा भाऊ पुण्यात असतो. त्यामुळे दोघांमध्ये विवाहासंदर्भात बोलणी झाली.
युवतीसाठी तो कतार येथील नोकरी सोडून दोन महिन्यांपूर्वी पुण्यात राहण्यासाठी आला. पण, त्याला युवतीची दुसऱ्याबरोबर मैत्री झाल्याचे समजले. तसेच, तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे अ‍ॅन्टो त्रासला होता़
(प्रतिनिधी)

Web Title: The love story of Facebook denied