शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

लॉटरीचं नशीबच धाेक्यात...!  महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद होणार?

By यदू जोशी | Updated: January 18, 2025 08:40 IST

काहींचे नशीब फळफळले तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली.

- यदु जोशीमुंबई : ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी...यश आज नाही तर उद्या’ आणि ‘नशिबाला संधीची आवश्यकता असते’ अशा जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्यात येणार आहे.

लॉटरी चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलेले नाही असे कारण देत हा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा प्रस्ताव वित्त विभाग तयार करत आहे. अचानक धनलाभ व्हावा यासाठी गेली साडेपाच दशके करोडो लोकांनी या लॉटरीची तिकिटे काढली.

काहींचे नशीब फळफळले तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली. अनेकांच्या भाग्याची परीक्षा पाहणाऱ्या लॉटरीला आता गाशा गुंडाळावा लागणार आहे. मटका, जुगाराचे व्यसन वाढलेले असताना त्याला पायबंद घालावा या हेतूने १२ एप्रिल १९६९ रोजी राज्य लॉटरीची सुरुवात करण्यात आली होती.

विक्रेत्यांना कमिशन दिल्यानंतर उर्वरित रकमेवर २८ टक्के जीएसटी राज्य सरकारला भरावा लागतो. मोठा आस्थापना खर्चही येतो. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने लॉटरी बंद करावी असा प्रस्ताव आहे. दुसरीकडे लॉटरी विक्रेता संघटनेचे म्हणणे आहे की लॉटरीची तिकिटे इतर राज्यांमध्ये विकण्यास अनुमती दिली तर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होऊ शकते.

महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. २० हजार लॉटरी विक्रेत्यांवर त्यामुळे गदा येणार आहे. सरकारने निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही आंदोलन करू.- विलास सातर्डेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेना.

प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. सर्व पैलूंचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.- आशिष जयस्वाल, वित्त राज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र