शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

महापालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; नवी मुंबईत सर्वाधिक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 06:05 IST

नवी मुंबई पहिल्या, ठाणे दुसऱ्या तर केडीएमसी तिसऱ्या नंबरवर

ठाणे  : ठाणे  आणि पालघर जिल्ह्यात ठाणे  महापालिका हरकती-सूचनांमध्ये दोन नंबरवर असल्याचे दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेत तब्बल तीन हजार ८५२ हरकती, सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर ठाणे  महापालिकेत एक हजार ९६२ हरकती सूचना आल्या आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ठाण्यात अक्षरश: हरकती आणि सूचनांचा धो धो पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५७८ हरकती - सूचना एकट्या नौपाडा-कोपरी या प्रभाग समितीतून आल्या आहेत.

ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातील ठाणे, उल्हासनगर, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई विरार या महापालिकांमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे, तर या महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना नुकत्याच जाहीर झाल्या होत्या. त्या जाहीर झालेल्या प्रभागरचनेबाबत हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. जिल्ह्यातील नवी मुंबईमध्ये सर्वाधिक ३८५२ हरकती-सूचना प्राप्त झाल्या असून, त्या पाठोपाठ ठाणे १९६२, केडीएमसी ९९७, उल्हासनगर ३९४ हरकती व सूचना प्राप्त झाल्या.

छाननी करून वर्गीकरणठाणे महापालिकेत प्राप्त झालेल्या हरकती - सूचनांची त्या त्या स्वरूपानुसार छाननी करून त्यांचे वर्गीकरण केले जात आहे. तसेच एकाच दिवशी म्हणजे येत्या २६ फेब्रुवारी रोजी हरकती - सूचना प्रभाग समितीनिहाय त्या त्या ठिकाणी मार्गी लावल्या जातील. तसेच आलेल्या हरकती- सूचनांची माहिती बुधवारी संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार असल्याने ते काम सुरू आहे. त्या सर्वांची माहिती टाइप करून सादर करायची असल्याने त्या कामासाठी १५ ते १६ टायपिस्टद्वारे काम सुरू असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका