शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 12:12 IST

राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. अजून खूप लोक रांगेत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिलाय.निरंजन डावखरे यांचं भाजपामध्ये स्वागत करतो. ते पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. अजून खूप लोक रांगेत आहेत. आताच काही सांगणार नाही, पण वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असं देवेंद्र फडणवीस उपस्थित पत्रकारांना उद्देशून म्हणाले आहेत. विशेष म्हणजे निरंजन डावखरे यांना भाजपा कार्यालयापर्यंत आज राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील सोडायला आले होते. त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर करावर कर असल्यानं किंमत वाढली आहे. आम्ही कर आधीच कमी केले आहेत, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, ज्यामुळे त्याची किंमत कमी होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही स्तुतिसुमनं उधळली आहेत. केंद्रानं मुंबईच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील सिंचनासाठी भरघोस निधी दिला आहे.आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपा प्रवेशराष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी पक्षाची साथ सोडून भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. नंदुरबारमधील वजनदार नेते आणि माजी मंत्री विजय कुमार गावित यांनी भाजपात प्रवेश करीत विधानसभा निवडणूक लढवली, ते मोठ्या मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या हिना गावित यांनी भाजपाकडून निवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग पत्करला.भिवंडीतील राष्ट्रवादीचे नेते कपिल पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भिवंडीमधून लोकसभा निवडणूक लढविली. सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद सदस्य संजय काका पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवली. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविलेले संजय सावकारे यांनीही राष्ट्रवादीला धक्का देत भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. बीडचे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री  सुरेश धस, विनायक मेटे, मुरबाडचे नेते किसन कथोरे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर आणि आजच ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देत भाजपात दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस