सेल्फीच्या नादात गमावले प्राण

By Admin | Updated: November 16, 2016 06:28 IST2016-11-16T06:28:28+5:302016-11-16T06:28:28+5:30

गडमंदिर परिसरात राम झरोक्यातून सेल्फी काढताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाला प्राण गमवावे लागले. मनोज कल्याणराव भुते

Lost soul in selfishness | सेल्फीच्या नादात गमावले प्राण

सेल्फीच्या नादात गमावले प्राण

रामटेक (जि. नागपूर) : गडमंदिर परिसरात राम झरोक्यातून सेल्फी काढताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाला प्राण गमवावे लागले. मनोज कल्याणराव भुते असे मृताचे नाव आहे.
रामटेक येथे रविवारपासून त्रिपूर पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवादरम्यान सोमवारी मध्यरात्री १२ वाजता गडमंदिरावर त्रिपूर जाळण्यात आला. त्यानंतर मनोज गडमंदिर परिसरातील राम झरोक्यातून सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो १५ फूट उंचीवरून खाली कोसळला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर उपचारांसाठी नागपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Lost soul in selfishness