सर्वशिक्षा अभियानाचा बोजवारा
By Admin | Updated: June 17, 2014 20:57 IST2014-06-17T19:49:39+5:302014-06-17T20:57:03+5:30
कर्मचारी हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे सर्वशिक्षा अभियान कामाचा बोजवारा उडाला आहे.

सर्वशिक्षा अभियानाचा बोजवारा
तेल्हारा : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत सर्वशिक्षा अभियान कार्यालयात गटसमन्वयक, विषय तज्ज्ञ कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आल्यामुळे तसेच नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे सर्वशिक्षा अभियान कामाचा बोजवारा उडाला आहे.
सोमवार, १६ जून रोजी तेल्हारा येथील सर्वशिक्षा अभियान कार्यालयात गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच येथे नेमण्यात आलेले कर्मचारी हे सतत गैरहजर राहतात. त्यांच्याकडे पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप व प्रशिक्षण अशी महत्त्वपूर्ण कामे असतानाही ते सतत गैरहजर राहतात. आता लवकरच शाळा सुरू होणार असल्याने शाळेची कामे कसे पूर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. जिल्हा कार्यालयाकडून याची दखल का घेतल्या जात नाही, गैरहजर कर्मचार्यांचे वेतन कसे काढल्या जाते, याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. कामाचे कर्मचारी कार्यमुक्त करून सतत गैरहजर राहत असलेले कर्मचारी नियुक्त करून संबंधित अधिकार्यांना काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.