पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूटमार

By Admin | Updated: July 12, 2017 04:52 IST2017-07-12T04:52:37+5:302017-07-12T04:52:37+5:30

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या चौघांपैकी सागर तेलम (२०, रा. देऊळवाडी, कसारा) याला नागरिकांनी चोप देऊन इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली

Lootmar in Pataliputra Express | पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूटमार

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूटमार

लोकमत न्यूज नेटवक
कल्याण : पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या चौघांपैकी सागर तेलम (२०, रा. देऊळवाडी, कसारा) याला नागरिकांनी चोप देऊन इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. कल्याण रेल्वे न्यायालयाने सागरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईत राहणारे उदय यादव (३२) हे बिहार येथे गावी जाण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री १२.१५च्या सुमारास पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये बसले. मुंबईहून सुटलेली ही गाडी सव्वा एकला कल्याणला पोहोचली. तेथे अनेक प्रवासी चढले. त्यानंतर गाडी कसाऱ्याच्या दिशेने निघाली. कल्याण स्थानक सोडून १५ मिनिटे होताच गाडीत चढलेल्या चौघांनी प्रवाशांना विनाकारण मारहाण करत पैसे लुटण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने यादव यांनाही मारहाण करत त्यांच्या खिशातील साडे सात हजारांची रोकड काढून घेतली. ते पाहून काही नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर काही प्रवासी हिंमत करू न त्यांच्या अंगावर धावून गेले. सागर प्रवाशांच्या कचाट्यात सापडला. अन्य तिघे स्थानक येताच पळून गेले. पोलिसांनी तपासाअंती तिघांनाही अटक केली असून ते अट्टल गुन्हेगार आहेत.

Web Title: Lootmar in Pataliputra Express