‘एक्स्प्रेस-वे’वर १५ मिनिटांत दोनदा लूटमार
By Admin | Updated: November 24, 2014 03:45 IST2014-11-24T03:45:59+5:302014-11-24T03:45:59+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा परिसरात शनिवारी रात्री अवघ्या १५ मिनिटांच्या कालावधीत लुटमारीच्या दोन घटना घडल्या़

‘एक्स्प्रेस-वे’वर १५ मिनिटांत दोनदा लूटमार
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा परिसरात शनिवारी रात्री अवघ्या १५ मिनिटांच्या कालावधीत लुटमारीच्या दोन घटना घडल्या़ चाकूचा धाक दाखवत दोन गाड्यांमधील प्रवाशांकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला.
चोरटे २० ते २५ वयोगटातील होते. ते मराठी, हिंदीमध्ये बोलत होते. वाशी येथील सुधीर माणिक शिंदे हे कुटुंबीयांसमवेत कारने चालले होते. उड्डाणपूल संपल्यानंतर गायकवाड यांनी गाडी थांबवली. त्याच वेळी तीन जणांनी त्यांच्याकडील ४० हजारांचा मुद्देमाल काढून घेतला. त्यानंतर चोरटे रस्ता ओलांडून पुणे-मुंबई लेनवर आले. तेथे त्यांनी पुण्यातील वानवडी येथे राहणाऱ्या आनंद वंजारा कुटुंबीयांकडून १ लाख ३३ हजारांचा ऐवज लुटला़