तलवारीचा धाक दाखवून चिंचवडमधील सराफाला लुटले
By Admin | Updated: August 12, 2016 23:53 IST2016-08-12T23:53:10+5:302016-08-12T23:53:10+5:30
चिंचवड मोहननगर येथील सराफाला तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. सहा हजार रूपये लंपास केले. गुन्हा दाखल करण्याचे काम

तलवारीचा धाक दाखवून चिंचवडमधील सराफाला लुटले
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि.13 - चिंचवड मोहननगर येथील सराफाला तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. सहा हजार रूपये लंपास केले. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. या प्रकरणी सतीश शहाणे (वय ४०, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार शहाणे याचे मोहननगर राम मंदिर जवळ पद्मावती ज्वेलर्स ही पेढी आहे. आज सायंकाळी काहीजण दुकानात आले. दमबाजी करून गेले. त्या नंतर रात्री साडे आठला दोघे तलवार घेऊन आले. शहाणे यांना पैसे मागितले. शिवीगाळ व दमदाटी करू लागले. तलवारीच्या धाक दाखवून मारहाण केली. गल्ल्यातील ६ हजार रुपये चोरून नेले. घटनेनंतर शहाणे यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. सीसीटीव्ही फूटेज तपासणी करण्याचे काम सुरु होते. कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.