शस्त्रांची लूट हा ‘अंडरवर्ल्ड’चा कट!पोलिसांना संशय : मुंबईतून आणखी तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:02 AM2017-12-18T03:02:49+5:302017-12-18T03:03:08+5:30

नाशिकमध्ये पोलीस कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटण्यात आला होता. मात्र ही केवळ चोरी नसून अंडरवर्ल्डच्या टोळीचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कटात किमान ३५ जण सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री मुंबईतून आणखी तिघांना पोलिसांनी नागपाड्याच्या कामाठीपुरा येथून ताब्यात घेतले.

 Looted arms is underworld! Police suspect: Three more arrested from Mumbai | शस्त्रांची लूट हा ‘अंडरवर्ल्ड’चा कट!पोलिसांना संशय : मुंबईतून आणखी तिघे ताब्यात

शस्त्रांची लूट हा ‘अंडरवर्ल्ड’चा कट!पोलिसांना संशय : मुंबईतून आणखी तिघे ताब्यात

Next

मुंबई : नाशिकमध्ये पोलीस कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटण्यात आला होता. मात्र ही केवळ चोरी नसून अंडरवर्ल्डच्या टोळीचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कटात किमान ३५ जण सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री मुंबईतून आणखी तिघांना पोलिसांनी नागपाड्याच्या कामाठीपुरा येथून ताब्यात घेतले.
उत्तर प्रदेश येथील बांदा जिल्ह्यातून शस्त्रसाठा चोरून मुंबईकडे घेऊन येत असताना शिवडीतील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७) याच्यासह तिघांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कटात उत्तर प्रदेशातील काही जणांसह मुंबईतल्या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. नाताळ, नवे वर्ष, २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडविण्याचा प्रयत्न होता का, या दिशेने चौकशी सुरू आहे. अजूनही पाशाकडून योग्य ती माहिती समोर येत नसल्याने त्याच्याशी संलग्न असलेल्या तसेच त्याच्या संपर्कात असलेल्यांकडे गुन्हे शाखेसह एटीएसने मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी सायन क्रॉस रोडवरून एकाला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपाडा येथील कामाठीपुरामधून एकाच कुटुंबातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिक पोलिसांची सावधगिरी
चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. संशयितांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. तसेच बेशुद्ध करण्याच्या औषधांच्या काही बाटल्या व ४८ हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
पाशासोबत एकाचे संभाषण-
पाशाच्या मोबाइल सीडीआरमधून अटक केलेल्यांपैकी एकासोबत संभाषण झाल्याचे समजते. तसेच तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यानुसार त्यांच्याकडे गुन्हे शाखेसह नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title:  Looted arms is underworld! Police suspect: Three more arrested from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.