ऐन सुट्टीच्या हंगामात होतेय दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:24 AM2019-05-20T05:24:57+5:302019-05-20T05:25:01+5:30

निरीक्षकांची ६७ पदे रिक्त : वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार अधांतरी

Loot of customers by shopkeepers during the holiday season | ऐन सुट्टीच्या हंगामात होतेय दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

ऐन सुट्टीच्या हंगामात होतेय दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

Next

जमीर काझी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कुटुंबीयासमवेत फिरण्यास बाहेर पडलेल्या प्रवाशांची महामार्गावरील मॉल्स व हॉटेल्समधून राजरोस लूट सुरू आहे. तेथे बाटलीबंद पाणी आणि खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांच्या माथ्यावर मारले जात आहेत. त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी कार्यरत वैद्यमापन शास्त्र विभागाचा कारभार अधिकाऱ्याविना केवळ कागदावरच कार्यरत राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका अधिकाºयाकडे तीन-तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने, त्यांची अवस्था ‘न घर का न घाट का’ अशी बनली आहे. कारण या विभागाकडील निरीक्षकाची २८८ पैकी तब्बल ६७ पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत, तर सहायक नियत्रकांची सध्या १५ पदे रिक्त असून, येत्या महिन्याअखेरीस त्यामध्ये आणखी दोघांची भर पडणार आहे.


अन्न व औषध विभागाच्या अखत्यारित कार्यरत असलेले वैधमापन शास्त्र विभागाची अपुºया मनुष्यबळामुळे दिवसेंदिवस बिकट अवस्था होत चालली आहे. खाद्यपदार्थाचे सीलबंद पॅकेट, बाटलीबंद पाणी व अन्य वस्तूच्या विक्री करणाºया आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या विभागाचे असते. त्यासाठी महसूल वर्गाप्रमाणे त्याचे सात विभाग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नियंत्रकाचे (कंट्रोलर) पद हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयाकडे असून, त्यांच्यामार्फत पूर्ण विभागाचे नियंत्रण चालविले जाते. त्यांच्यानंतरची विभागवार सात उपनियंत्रक
कार्यरत असले, तरी प्रत्यक्षात ‘फिल्ड’वरची कामे करणाºया सहायक नियंत्रक व निरीक्षक पदाचा वानवा आहे. दोन्ही पदासाठी
अनुक्रमे ४६ व २८८ पदे मंजूर असली, तरी सध्या केवळ ३१ व २११ पदे पूर्ण राज्यात कार्यरत असल्याची माहिती विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.

दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ व ६७ पदे रिक्त असून, अधिकाऱ्यांच्या निवृत्तीप्रमाणे दरवर्षी त्यामध्ये वृद्धी होत राहिली आहे. त्यामुळे एका-एका अधिकाºयाकडे नियमित पदाशिवाय अन्य दोन-दोन, तीन-तीन ठिकाणांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

अशी चालते ग्राहकांची लुटमार
सुट्टीच्या हंगामामुळे महामार्गावरील हॉटेल्स, दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी १४ रुपयांची पाण्याची बाटली १८ ते २० रुपयांना विकली जात आहे. शीतपेय आणि फूड पॅकेट्सही छापील किमतीपेक्षा सरासरी ४ ते ८ रुपये अधिक दराने विकले जात आहेत. दराच्या तफावतीबाबत दुकानचालकाकडे विचारणा केल्यास, ‘या दरात तुम्हाला घ्यायची असेल, तर घ्या किंवा घेऊ नका,’ असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना गरजेपोटी जादा दराने वस्तू खरेदी करावे लागते. काही मॉल्स व हॉटेलच्या परिसरात वैधमापन विभागाकडून वस्तू विक्रीबाबतचे फलक लावले असून, तक्रारीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे. मात्र, त्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर कार्यवाही तर दूरच काहीच प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे विनाकारण वेळ वाया जात असल्याने नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे.

पाण्डेय, सानप यांच्या कारवाईचे स्मरण
वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकाने जर मनात आणले, तर लुटमार करणाºया अस्थापनावर वचक बसतो. साडेतीन, चार वर्षांपासून तत्कालीन नियंत्रक संजय पाण्डये यांनी नियमांची पायमल्ली करणाºयावर कारवाई करून, बेशिस्त मॉल, शॉपवर वचक बसविला. त्यांच्यापूर्वी डॉ. माधवराव सानप यांनी नियमबाह्य अस्थापनावर कारवाईचा बडगा उगारला होता. ग्राहकांना आता त्यांच्या कारकिर्दीचे स्मरण होत आहे.

Web Title: Loot of customers by shopkeepers during the holiday season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.