जिकडे पहावा तिकडे भ्रष्टाचार दिसतो - उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By Admin | Updated: July 5, 2015 15:13 IST2015-07-05T14:12:22+5:302015-07-05T15:13:23+5:30

सध्या जिकडे पहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीं भाजपावर अप्रत्यक्षरिता टीका केली.

Looks like corruption takes place - Uddhav Thackeray's BJP tunes | जिकडे पहावा तिकडे भ्रष्टाचार दिसतो - उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

जिकडे पहावा तिकडे भ्रष्टाचार दिसतो - उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा व शिवसेनेमध्ये काहीही आलबेल नसल्याचे अद्यापही दिसत असून भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे, घोटाळ्याचे आरोप होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनींही भाजपावर निशाणा साधला आहे. 'सध्या जिकडे पहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर अप्रत्यक्षरिता टीका केली. शिवसेनेतर्फे मराठी तरूणांना उद्योगासाठी टेम्पो वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 
वडापावच्या गाडीवरून अनेकजण सेनेवर टीका करत असतात, पण मराठी माणसाला शिवसेनेनेच स्वाभिमान दिला, इतकेच मी टीकाकारांना सांगेन, असे ते म्हणाले.  मराठी माणूस उद्योगक्षेत्रात मागे नाही हेही सर्वांना दाखवून दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी तरूणांना केले.
'मराठी माणसाने ठरवल्यास सेनेला एकहाती सत्ता देईल'
गेल्या निवडणुकीत मी जनतेकडे शिवसेनेची सत्ता मागितली होती, मात्र पूर्ण सत्ता मिळाली नाही म्हणून आम्ही आमच्या वचनांपासून पाठ फिरवली नाही. शिवसेना सत्तेसाठी काम करत नाही असे सांगत जर मराठी माणसाने ठरवले तर शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवून देतील' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Looks like corruption takes place - Uddhav Thackeray's BJP tunes