शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची स्थिती पाहून येते दया…’’, एकनाथ शिंदेंकडून आठवलेस्टाईलमध्ये कांग्रेसच्या वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 17:25 IST

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून एक कविता ऐकवत महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या स्थितीबाबत खोचक टिप्पणी केली. 

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आक्रमक असलेल्या विरोधकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतकाँग्रेसवरही शिंदे यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून एक कविता ऐकवत महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या स्थितीबाबत खोचक टिप्पणी केली. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे, नाना पटोले इथे नाहीत, त्यामुळे मी फार काही बोलू शकत नाही. तसा काँग्रेसचा आधीही प्रॉब्लेम होताच. बाळासाहेब थोरात विचारायचे काय चालू आहे. मग मी माझ्या हातात काही नाही, माझ्या हातात असतं तर तुमच्यासाठी काहीतरी केलं असतं, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी सभागृहात एक कविता वाचून दाखवली. काँग्रेसची स्थिती पाहून येते दया,महाविकास आघाडीची पुरती गेली रया,दादा आणि अंबादास बसले,काँग्रेसवाले हात चोळत बसले,  एकेकाळी इंदिराजींच्या काँग्रेसची होती किती वट आता टोमणेसेनेसोबत होतेय नुसती फरफट, अशा आठवले स्टाईल कवितेमध्ये एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले.

दरम्यान, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणणाऱ्यांनाही एकनाश शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. हो मी कंत्राटी मुख्यंमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांच दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाकी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लगावला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस