शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजकारणात कधीच आलो नसतो; अमित ठाकरेंनी युवकांना स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:42 IST

दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून यावं अशी साद अमित यांनी युवकांना घातली आहे. 

पुणे - अलीकडच्या राजकारणात नेत्यांच्या कोलांट्याउड्या अन् बदलणारी सत्तासमीकरणे यामुळे युवकांचा राजकारणाकडे बघण्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. कुणीही राजकारणात येण्यासाठी सहसा तयार होत नाही. राजकारण म्हटलं तर अनेक तरुण त्यापासून दूर राहणेच पसंत करतात. त्यात राजकीय मंडळीची पुढची पिढी राजकारणात उतरली आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात यावं का? असा प्रश्न पत्रकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेंना विचारला होता. त्यावर अमित यांनीही दिलखुलासपणे उत्तर दिले. 

मनसे नेते अमित ठाकरे सध्या मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभर दौरा करत आहेत. यावेळी पुण्यात अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात कधीच आलो नसतो. मला लोकांसाठी काम करायला आवडतं. पण ही आवड असली तरी सध्याच राजकारण पाहता मी कधीच राजकारणात आलो नसतो. मात्र माझ्यासाठी राज साहेबांनी प्लॅटफॉर्म तयार करून दिलंय. त्यामुळे दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून यावं अशी साद अमित यांनी युवकांना घातली आहे. 

त्याचसोबत सत्ता बदलाचे मला काही वाटत नाही. मी बातम्या वाचतच नाही. माझं फोकस क्लिअर आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे. यासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांना उपलब्ध होईन. यासाठी माझा नंबर त्यांना देतोय. रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा या समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी. यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा. त्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने मी हा दौरा करतोय असंही अमित ठाकरेंनी सांगितले. गृहमंत्रिपदाची अफवामी मंत्री होणार अशी अफवा होती. पुढचे २० दिवस मला पत्रकार याबाबत सातत्याने विचारत होते. ही बातमी खोटी आहे असं राजसाहेबांनी सांगितले. मीदेखील सांगून थकलो होतो. म्हणून मी म्हटलं गृहमंत्रिपद दिले तर आपण विचार करू. राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल असं पत्रकारांना सांगितले. त्यावरून गृहमंत्रिपदाच्या बातम्या सुरू झाल्या असा किस्सा अमित ठाकरेंनी गंमतीने पत्रकारांना सांगितला. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे