मोदींसाठी नवा डिझायनर लूक!

By Admin | Updated: May 20, 2014 03:41 IST2014-05-20T03:41:40+5:302014-05-20T03:41:40+5:30

लोकसभा निवडणुकांच्या निकालाने देशातील मोदींचे असणारी लोकप्रियता सिद्ध केलीच आहे. या नरेंद्र मोदींचे लाखो चाहते रोज त्यांच्यासाठी काही ना काही करीत असतात

Look for a new designer for Luke! | मोदींसाठी नवा डिझायनर लूक!

मोदींसाठी नवा डिझायनर लूक!

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालाने देशातील मोदींचे असणारी लोकप्रियता सिद्ध केलीच आहे. या नरेंद्र मोदींचे लाखो चाहते रोज त्यांच्यासाठी काही ना काही करीत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे स्थित सई सुमन या फॅशन डिझायरने भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी स्पेशल लूक डिझाईन केला आहे. मोदींच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आता त्यांची ‘स्टाईल’ फॉलोअर्स वाढावे, भावी पंतप्रधान म्हणून मोदींनीही आपले स्टाईल स्टेटमेंट ‘मेन्टेन’ करावे या दृष्टिकोनातून सई सुमन या फॅशन डिझायरने मोदींसाठी खास पोशाख तयार केला आहे. या पोशाखात नैसर्गिक धाग्यांपासून तयार केलेले कापड वापरले आहे. मोदींसाठी सूटसोबतच विविध रंगांचे जॅकेट्सही तिने डिझाईन केले आहे. या डिझाईनची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, या सूटला भाजपाचे चिन्ह असणार्‍या हॅँडीक्राफ्टच्या कमळाचे चिन्ह आहे. तर याची कॉलर जोधपुरी स्टाईलची आहे. तर कट कॉलरही वेगळ्या स्टाईलची आहे. राजकारणी म्हटले की, फक्त पांढरा किंवा काही ठरावीक रंगच डोळ्यांसमोर येतात. मात्र या जुनाट समजुतीला तडा देत सईने निरनिराळ्या रंगांची जॅकेट्स मोदींसाठी डिझाईन केली आहेत. कोणताही रंग मिरवायला जो आत्मविश्वास लागतो, तो मोदींकडे आहे, असे सईने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Look for a new designer for Luke!