पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतोय - उद्धव

By Admin | Updated: July 6, 2015 03:46 IST2015-07-06T03:46:18+5:302015-07-06T03:46:18+5:30

जिकडे पाहावे तिकडे आज भ्रष्टाचार दिसतोय, असे सूचक विधान करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र डागले.

Look at corruption - Uddhav | पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतोय - उद्धव

पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतोय - उद्धव

मुंबई : जिकडे पाहावे तिकडे आज भ्रष्टाचार दिसतोय, असे सूचक विधान करत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली नसतानाही आम्ही आमची वचनपूर्ती करीत आहोत. मराठी माणूस एक दिवस नक्कीच शिवसेनेला पूर्ण सत्ता देईल याची आम्हाला खात्री आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र डागले.
गेल्या काही दिवसात केंद्र आणि राज्य सरकारांमधील भाजपाच्या मंत्र्यांची एकापाठोपाठ अशी प्रकरणे समोर आल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यात आता उद्धव यांनीही टीकेचा सूर लावल्याने पावसाळी अधिवेशन बरेच वादळी ठरण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Look at corruption - Uddhav