लोणावळ्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला

By Admin | Updated: August 11, 2016 12:28 IST2016-08-11T12:28:30+5:302016-08-11T12:28:59+5:30

गुरुवारी सकाळपासून लोणावळ्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

Lonavla rain increased again | लोणावळ्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला

लोणावळ्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला

>ऑलाइन लोकमत
लोणावळा, दि. ११ -  दहा दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर मागील दोन दिवसापासून सरीवर सुरु असलेल्या पावसाचा जोर आज गुरुवारी सकाळपासून पुन्हा वाढल्याने रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. लोणावळ्यात पावसाचा जोर वाढून पुन्हा आपत्कालिन स्थिती निर्माण झाल्यास येणारा शनिवार व रविवार व सोमवार (दि. १३,१४ व १५ आँगस्ट) लोणावळ्यतील पर्यटनस्थळे सुरक्षेच्या दृष्टीने  बंद ठेवण्याचा सुतोवात पोलीस प्रशासनाने केला होता. त्यातच पावसाचा जोर आज अचानक वाढल्याने व्यावसायकांमध्ये धडकी भरली आहे. 
 लोणावळा शहरात मागील २४ तासात ७१ मिमी पाऊस झाला असून आज अखेरपर्यत ३२५१ मिमी पाऊस झाला आहे. पावसाला मागील वर्षीची सरासरी ओलांडण्यासाठी केवळ  ९८ मिमी पाऊस कमी असून आज दिवसभरात पावस मागील वर्षीच्या एकूण पावसाचा आकडा पार करेल अशी शक्यता आहे.

Web Title: Lonavla rain increased again