लोणावळा - भूशी धरणाकडे जाणारा रस्ता बंद
By Admin | Updated: July 9, 2016 18:02 IST2016-07-09T18:02:09+5:302016-07-09T18:02:09+5:30
भूशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या जवळपास ५ ते ६ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने भूशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी २:३० वाजता बंद करण्यात आला आहे

लोणावळा - भूशी धरणाकडे जाणारा रस्ता बंद
>ऑनलाइन लोकमत -
लोणावळा, दि. 09 - भूशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या जवळपास ५ ते ६ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने भूशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी २:३० वाजता बंद करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढल्याने शहरातून भूशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी लायन्स पॉईंट ते मावळा पुतळा चौकापर्यत वाहनांच्या रांगा लागल्याने लोणावळा शहर पोलिसांनी मार्ग बंद केला आहे.