लोणावळ्यात २४ तासात १६३ मिमी पाऊस

By Admin | Updated: July 2, 2016 14:30 IST2016-07-02T12:31:52+5:302016-07-02T14:30:17+5:30

लोणावळा परिसरात शुक्रवार पासून पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासात शहरात तब्बल १६३ मिमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

Lonavala received 163 mm of rain in 24 hours | लोणावळ्यात २४ तासात १६३ मिमी पाऊस

लोणावळ्यात २४ तासात १६३ मिमी पाऊस

>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. २ -  लोणावळा परिसरात शुक्रवार पासून पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासात शहरात तब्बल १६३ मिमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
लोणावळा व पाऊस हे समीकरण असले तरी जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने नागरिक हवालदिल झाले होते. जुलैच्या पहिल्याच दिवशी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावला. पावसाचा हा जोर दिवसभर व शुक्रवारी रात्री कायम राहिल्याने शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले असून नदीसह ओढे नाले भरुन वाहू लागले. डोंगरावरुन धबधबे देखिल वाहू लागले असून भूशी धरणाच्या पाणी साठ्यात देखिल वाढ झाली आहे.⁠⁠⁠⁠

Web Title: Lonavala received 163 mm of rain in 24 hours