शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 19:49 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून त्यात शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे.

मुंबई - Shrikant Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) मंत्री कुणाला करायचा हा सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. परंतु मला जर त्यांनी विचारलं, तुला मंत्री व्हायचंय का? तर मी सरळ सरळ मला मंत्री होण्यास बिल्कुल रस नाही. मला पक्ष संघटना, पक्षाचे काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यास जास्त रस आहे. पक्ष कसा वाढेल यासाठी मला काम करायचं आहे अशी भूमिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडली आहे. त्यामुळे मंत्रि‍पदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, माझ्यावर गटनेत्याची जबाबदारी दिली आहे. आमच्या पक्षात मेरिटनुसार मंत्री बनवलं जाईल. एकनाथ शिंदे ज्यांना सांगतील ते मंत्री होतील. मला पक्षाचं, संघटनेचं काम तळागाळात घेऊन जाण्यास रस आहे. पक्षासाठी पक्ष बांधणी, ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्यासाठी काम करायचे आहे. मला तिसऱ्यांदा लोकांनी खासदार बनवलं. मी खूप समाधानी आहे. २७ व्या वर्षी मी पहिल्यांदा खासदार बनलो. मतदारसंघासाठी चांगले काम करत राहीन असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मेरिटनुसार कुणाला मंत्री करायचे याचा निर्णय घेतील. पक्षात वेगवेगळे नेते, खासदार आहेत. ज्यांचा अनुभव आहे. ज्यांनी पक्षासाठी खूप वर्ष काम केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील असंही श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केले. 

दरम्यान, गेल्या २ वर्षांमध्ये शिवसेनेला मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. जी १९ टक्क्यांची व्होटबँक शिवसेनेची होती त्यातील १४.५० टक्के मतदान आमच्या बाजूने आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांच्या वाट्याला केवळ साडे चार टक्के मतदान आलं. येणाऱ्या काळात ते साडे चार टक्के मतदानही आमच्या बाजूला येईल. त्यासाठी आगामी विधानसभेला आम्ही पूर्ण ताकदीने काम करू असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेचा मूळ मतदार आमच्यासोबत राहिला

राज्यात सरकार बनलं तेव्हापासून हे सरकार पडणार अशी स्वप्ने काहींना पडतात. मुंगेरीलाल के हसीन सपने हे आपण ऐकलं आहे. त्या स्वप्नात त्यांना जगू द्या. आज त्यांची काय परिस्थिती झाली आहे. आज त्यांच्या ज्या जागा जिंकून आल्या त्या कुणाच्या व्होटबँकमुळे जिंकून आल्या याचं आत्मपरिक्षण केले तर येणाऱ्या काळात त्यांची काय स्थिती होईल याची जाणीव झाली पाहिजे आणि नाही झाली तर उद्याच्या विधानसभेत आजसारखी परिस्थिती होईल. व्होटबँक पॉलिटिक्समध्ये लोकांची दिशाभूल त्यांनी केली. जे मूळ मतदार शिवसेनेचे होते ते आमच्यासोबत राहिले. मराठी माणूस हा शिवसेनेसोबत उभा राहिला आहे. ज्या जागा पडल्या, त्याठिकाणी कुठल्या भागातून या लोकांना मतदान झाले त्याचे आत्मपरिक्षण या लोकांनी केले पाहिजे असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उबाठा गटाला लगावला.  

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल