शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई का नाही?; काँग्रेस नेतेमंडळींचे दिल्लीकडे बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 09:36 IST

कोल्हापूरच्या खाडेंवर मात्र निलंबनाची कारवाई

दीपक भातुसेमुंबई : लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केली म्हणून कोल्हापूर मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे बाजीराव खाडे यांना काँग्रेसने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. मात्र, सांगलीत बंड करणाऱ्या विशाल पाटील यांच्याबाबत मौन बाळगले आहे. याबाबत कारवाई करण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला नसून तो अखिल भारतीय काँग्रेसला असल्याचे सांगितले जात आहे.खाडे यांनी युवक काँग्रेस ते राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले. प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय ओळखले जात होते. 

कारवाईकडे दुर्लक्ष...सांगलीतून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता. उद्धवसेनेनेही कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडे केली होती.  २२ एप्रिल रोजी सांगली मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा होता. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता बंडखोरी केली आहे. काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारीही सध्या विशाल पाटील यांचा प्रचार करीत आहेत. 

काँग्रेसचे नेते आज सांगलीतसांगलीतील उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गुरुवारी सांगलीत सभा होत आहे.

कारवाईसाठी दिल्लीचे कारणकाँग्रेस पक्षाच्या राज्यघटनेनुसार लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारावर कारवाई करण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष किंवा राज्य प्रभारीला असतात. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसवर दोन प्रकारचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात. काही प्रतिनिधी हे प्रदेश काँग्रेसतर्फे नियुक्त केले जातात तर काही प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेसतर्फे नियुक्त केले जातात. विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसमार्फत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अखिल भारतीय काँग्रेसला आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने विशाल पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे प्रदेश काँग्रेसमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :sangli-pcसांगलीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४