शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

विकासाला विरोध म्हणजेच राजकारण असं उद्धव ठाकरे समजतात; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 06:44 IST

काँग्रेसपेक्षा ठाकरेंकडून अल्पसंख्याकांचे अधिक लांगुलचालन

श्रीमंत माने/विकास मिश्रनागपूर : उद्धव ठाकरेंना विकास हा विषयच समजत नाही. विकासाला विरोध म्हणजेच राजकारण, असे ते समजतात. त्याचप्रमाणे भाजपला विरोधाच्या नादात आता त्यांनी हिंदुत्व पूर्णपणे सोडले असून, ते अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यात काँग्रेसच्याही पुढे गेले आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर फडणवीस हे शुक्रवारी रात्री उशिरा ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, समृद्धी महामार्ग, मुंबईचा कोस्टल रोड, अटल सेतू अशा विकास प्रकल्पांना उद्धव ठाकरे यांनी विरोध केला, मच्छीमारांना उचकावण्याचा अपयशी प्रयत्न केला. कामे पूर्ण झाल्यानंतर मात्र श्रेय घेण्यासाठी पुढे आले. नाणार येथील रिफायनरीला त्यांच्या विरोधामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आणि ते आता वाढवण बंदरालाही विरोध करीत आहेत. हा केवळ विरोधासाठी विरोध आहे. 

आमच्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले हा आरोप चुकीचा आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्यानुसार, पुत्रप्रेमामुळे आंधळे झालेले ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व इतरांचे पंख कापले, तर मुलीच्या राजकारणासाठी शरद पवारांनी अजितदादांना संधी दिली नाही. त्याला कंटाळूनच दोघांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजकारणात आम्ही साधूसंत बनण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे आम्ही त्या संधीचा लाभ घेतला इतकेच, असे ते म्हणाले.

ठाकरे व पवार हे ही बाब मान्य करीत नाहीत. उलट या मुद्द्याचा उपयोग काँग्रेसला हतोत्साहीत करण्यासाठी करतात. काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. सांगली, भिवंडी किंवा मुंबईतल्या हक्काच्या जागाही काँग्रेसला मिळाल्या नाही. ठाकरे अल्पसंख्याक लांगूलचालनाबाबत काँग्रेसशी स्पर्धा करीत आहेत. मराठी-मुस्लीम मतांच्या बळावर महायुतीला पराभूत करू शकू, अशा भ्रमात ते आहेत. मराठी मते आमच्याकडेही आहेत, हे ते विसरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कुरघोडी नव्हे मोठ्या भावाच्या भूमिकेतमहायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मान्य आहे. आम्हा तिघांमध्ये समन्वय तसेच एकवाक्यता असल्याने महायुतीबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. लोकसभेच्या जागावाटपात काही ठिकाणी थोडाबहुत पेच असला, तरी त्यामुळे राज्यभरात चुकीचा संदेश गेला नाही. बारामतीत आम्ही एकजुटीने लढत आहोत. माढात आमची लढाई स्वकीयांशीच आहे. 

उत्तम जानकर मोहिते-पाटलांसोबत गेले तरी कार्यकर्ते सोबत येणार नाहीत. त्याचा फायदा महायुतीला होईल. महायुतीत मोजक्या जागांवर पेच आहे. तो आज-उद्या सुटेल. नाशिकचा पेच छगन भुजबळांनी माघार घेऊन सोडविला, असे फडणवीस म्हणाले.

देशभर पंतप्रधान मोदींची लाटगेल्या दहा वर्षांमधील विविध आघाड्यांवरील सरकारची कामगिरी हाच विजयाचा मंत्र आहे. देशभर मोदी यांची लाट आहे. सर्वेक्षणांमध्ये ती सापडत नाही. विशेषत: सर्व्हेमध्ये महिलांची मते फारशी घेतली जात नाहीत आणि तिथेच मोदींचा प्रभाव अधिक आहे.

आदित्यला सीएम म्हणून तयार करेन अन् दिल्लीत जाईन असे फडणवीस म्हणाले होते!देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की ते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील; पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा नवा दावा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंबाबत आश्वस्त केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ते म्हणाले, अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपाचा मुख्यमंत्री होईन, हे अमित शाहांसोबतच्या चर्चेत ठरले होते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४