शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

विदर्भातील 'या' ५ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार; शेवटची तारीख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 10:28 IST

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार असली तरी अद्याप यांच्यातील जागावाटप निश्चित झालं नाही.

नवी दिल्ली - Lok sabha first phase voting ( Marathi News ) लोकसभा निवडणूक २०२४ साठी देशात सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी होईल. अधिसूचना जारी होताच उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करू शकतात. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यातील १०२ जागांवर मतदान होईल. या पहिल्या टप्प्यात १० राज्यांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मार्च असेल. 

पहिल्या टप्प्यात जे उमेदवार अर्ज भरतील त्यांना उमेदवारी मागे घेण्याची मुदत ३० मार्च असेल. बिहारमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ मार्च तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २ एप्रिल असणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या ५ जागांवर मतदान होणार आहे. 

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार असली तरी अद्याप यांच्यातील जागावाटप निश्चित झालं नाही. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश असेल की नाही याबाबतही साशंकता आहे. कारण जागावाटपावर महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याचं दिसून येत आहे. तर महायुतीतही जागावाटपावरून कुणाला किती जागा मिळणार हे निश्चित नाही. 

दरम्यान, भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील नागपूरहून नितीन गडकरी, चंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले आहे. परंतु रामटेक, गडचिरोली-चिमूर, भंडारा गोंदिया याठिकाणचे उमेदवार अद्याप ठरले नाहीत. रामटेकच्या जागेवर सध्या शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने खासदार आहेत. त्याठिकाणी उमेदवार बदलणार अशी चर्चा आहे. तर भंडारा गोंदिया हा मतदारसंघ महायुतीत भाजपा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार हे स्पष्ट नाही. गडचिरोलीच्या जागेवर अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील या जागांवर अद्याप महायुतीत अद्यापही चर्चा सुरू असल्याचं बोललं जाते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाnagpur-pcनागपूरchandrapur-pcचंद्रपूर