शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत २ जागांचा तिढा सुटेना; महायुतीत ठाणे, पालघरचेही ठरेना, मविआत काँग्रेसला उमेदवार सापडेना

By दीपक भातुसे | Updated: April 22, 2024 07:42 IST

Loksabha Election - मुंबईतील सहा जागांपैकी महायुतीत अधिकृत घोषणा झाली नसली तरी पाच जागांचे वाटप निश्चित झाले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तरी महायुतीत काही जागांचा पेच अद्याप कायम आहे, तर महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाले असले तरी काही मतदारसंघांतील उमेदवार कोण, याबाबत प्रश्न आहे.

मुंबईतील सहा जागांपैकी महायुतीत अधिकृत घोषणा झाली नसली तरी पाच जागांचे वाटप निश्चित झाले आहे. मात्र, मुंबई दक्षिणची जागा भाजपला जाणार, की शिंदेसेनेकडे राहणार, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. इथे उद्धवसेनेने खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली असून, त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उमेदवार कोण, हे भाजपला अद्याप ठरवता आलेले नाही. पूनम महाजन सध्या इथून खासदार आहेत. मात्र, भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची चर्चा आहे.

नको असलेला मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात  महाविकास आघाडीत मुंबईतील सहा जागांचे वाटप केव्हाच निश्चित झाले आहे. यातील चार जागा उद्धवसेनेला तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. यातील मुंबई उत्तर जागा नको असतानाही काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे. या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने काँग्रेसला हा मतदारसंघ नको होता. त्यामुळे इथे उमेदवार कोण, हा प्रश्न अजूनही काँग्रेसला सोडवता आलेला नाही. मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघातही उमेदवार कोण, याच्या शोधात काँग्रेस आहे. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसची स्थिती सारखीच आहे. दोन्ही पक्षांना इथे उमेदवार कोण, हा प्रश्न सोडवता आलेला नाही.  

महायुतीत ठाणे, पालघर कुणाच्या वाट्याला?महायुतीत ठाणे आणि पालघरच्या जागेचा निर्णयही अद्याप प्रलंबित असून, भाजप आणि शिंदेसेना दोघेही या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. त्यापुढे जाऊन इथल्या उमेदवारांचा प्रश्नही या पक्षांना सोडवायचा आहे.

टॅग्स :Mahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४