लोकमतचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला पद्मश्री पुरस्कार
By Admin | Updated: April 12, 2016 16:59 IST2016-04-12T16:50:17+5:302016-04-12T16:59:23+5:30
लोकमत समुहाचे फ़ोटो एडिटर सुधारक ओलवे यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला

लोकमतचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला पद्मश्री पुरस्कार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - लोकमत समुहाचे फ़ोटो एडिटर सुधारक ओलवे यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन ५६ दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यासारख्या दिग्गजांचा समावेश होता.
सुधारक ओलवे यांना सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. २८ मार्चला ५६ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर इतर मान्यवारांना आज मंगळवारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमतचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांच्या छायाचित्र क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुधारक ओलवे तीन दशकांहून अधिक काळ छायाचित्रण क्षेत्रामध्ये कार्यरत असून, त्यांनी विविध सामाजिक विषय फोटोंमधून मांडले आहेत.
झारखंडमधील माता-बालमृत्यू, कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन, सफाई कामगार, मेघालयातील आदिवासींची स्थिती अशा विविध विषयांमधून त्यांनी सामाजिक जाणीव प्रकट केली आहे. ओलवे यांनी दोनवेळा भारतभ्रमण केले आहे, तसेच परदेशातही छायाचित्रण केले आहे.