लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’चे आज लोकार्पण
By Admin | Updated: December 21, 2014 00:19 IST2014-12-21T00:19:49+5:302014-12-21T00:19:49+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे लोकार्पण उद्या रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी येथे एका शानदार समारंभात करण्यात येणार आहे.

लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’चे आज लोकार्पण
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे लोकार्पण उद्या रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी येथे एका शानदार समारंभात करण्यात येणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ‘कॉफी टेबल बुक’चे लोकार्पण होईल. प्रसिद्ध उद्योगपती तसेच ‘जेएसडब्लू ग्रुप’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित राहतील. लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. स्थानिक रामदासपेठेतील ‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’ येथे सायंकाळी ५.३० वाजता हा समारंभ होईल. नागपूरकरांना अभिमान वाटावा अशी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या यशाची गाथा या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.स्वत: पुढाकार घेऊन समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी झटणाऱ्या प्रेरणादायी व्यक्ती प्रत्येक शहरात असतात. या व्यक्तींच्या दूरदृष्टीमुळे राज्यालादेखील नवी दिशा मिळते. अशाच व्यक्तिमत्त्वांचा सन्मान व्हावा व नवीन पिढ्यांना त्य््च२२्छाांच्यापासून मार्गदर्शन मिळावे यासाठी लोकमत समूहाने ‘आयकॉन्स आॅफ सिटी’ या ‘कॉफी टेबल बुक’च्या मालिकेची सुरुवात केली आहे. ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ हे याचेच पुढचे पाऊल आहे. लोकमतच्या ‘आयकॉन्स आॅफ पुणे’ या ‘कॉफी टेबल बुक’चे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तर ‘आयकॉन्स आॅफ औरंगाबाद’चे लोकार्पण उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते झाले होते हे विशेष. (प्रतिनिधी)