शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत वुमेन समीट 2019 : उलगडणार महिलांच्या नेतृत्वाची गरुडझेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:02 IST

नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान ‘लोकमत वुमन समीट’च्या आठव्या पर्वात केला जाणार आहे.

ठळक मुद्देएनईसीसी आणि लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा सहयोग, विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांचा सहभागमहिलांच्या सन्मानाचा हा नेत्रदीपक सोहळा उद्या (मंगळवारी) रंगणार

पुणे : आजवर स्त्री लढली ती स्वत:च्या अस्तित्वासाठी! वेगाने बदलणा काळाची साक्षीदार असलेल्या स्त्रीचे अस्तित्व हा समाजाचा आरसा आहे. आता वेळ आहे तिने समाजाचे नेतृत्व करण्याची!  विविध क्षेत्रांमध्ये आत्मविश्वासाने नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान ‘लोकमत वुमन समीट’च्या आठव्या पर्वात केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानाचा हा नेत्रदीपक सोहळा उद्या (मंगळवारी) रंगणार आहे. ‘लीव्ह टू लीड’ या संकल्पनेअंतर्गत आपल्या असीम कर्तृत्वाने जगाला अचंबित करणाऱ्या स्त्रीचे नेतृत्व तिच्याच नजरेतून जाणून घेण्याची संधी लोकमत माध्यम समूहाने उपलब्ध करुन दिली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र महिला आयोग आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.

परिषदेला प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, जल आणि शाश्वत विकासच्या तज्ज्ञ रुपाली देशमुख, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव विनीता सिंघल, लेक्झिकॉन स्कूल्सच्या संचालिका डॉ. मोनिषा शर्मा, सिम्बायोसिसच्या संचालक स्वाती मुजुमदार, तृतीयपंथीयांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या गौरी सावंत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, ऐश्वर्या तमाईचीकर, उद्योजिका सुजाता चॅटर्जी, श्रद्धा शर्मा,  प्रसिद्ध वेडिंग डेकोर डिझायनर गुरलीन पुरी उपस्थित राहणार आहेत. महिलांनी आज समाजाच्या सर्व क्षेत्रांत नेतृत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. महिलांच्या शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाईंच्या दिशेने दगड फेकले गेले. त्यावरही महिलांनी मात केली. शिक्षणाचे अग्निपंख मिळाल्याने देशातील पहिल्या डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी  यांनी मान मिळविला. संस्कृतमध्ये वादविवाद करून शास्त्रार्थात सनातन्यांचा पराभव करणाऱ्या रमाबाई रानडे यांचे कर्तृत्व अढळ ताऱ्यासारखे चमकू लागले. लक्ष्मीबाई टिळक यांनी महिलांची व्यक्त होण्याची वाट प्रशस्त केली. महिलांच्या इतिहासातील या चारही टप्प्यांनी महिलांना नेतृत्वाकडे झेप (लिव्ह टू लिड) घेणे शक्य झाले. विविध परिसंवादातून हा प्रवास उलगडणार आहे. डीपीईएस व हॉटेल माधव इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी आणि धीरेंद्र आऊटडोअर मीडिया प्रा. लि. आऊडोअर पार्टनर आहेत. 

......................

* नियोजित ध्येयपूर्तीकडे जाण्यासाठी आणि या प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असते. पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणा-या कॉर्पोरेट क्षेत्रात स्त्रीने आपले अस्तित्व आणि नेतृत्व सिध्द केले आहे. महिलांच्या या गगनभरारीची दखल लोकमत वुमेन समिटच्या माध्यमातून घेतली जात आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. प्राचीन काळापासून स्त्रीने वैचारिक क्रांती घडवून आणली आणि आपल्या विचारांतून, कृतीतून समाजपरिवर्तनात मोलाचे योगदान दिले. स्त्रीच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय समाजाचे चित्र पूर्ण होऊच शकत नाही. समानतेचे सूत्र समाजात रुजत असतानाच ‘स्त्रीने नेतृत्व करण्यासाठी जगावे’ हा संदेश सकारात्मक दिशा देणारा आणि तिचे बळ वाढवणारा आहे. कोणत्- अनुराधा देसाई, चेअरमन, व्हीएच ग्रूप-------------* आपल्या विचारांतून, कृतीतून स्त्रीने समाजासमोर कायम नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रस्थापित मानसिकतेला छेद देत महिला स्वत:चे नवे विश्व निर्माण करु पाहत आहेत. आज अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या हुद्यावर, महत्वाच्या पदांवर तसेच निर्णयप्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्वाचा सहभाग आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत असतानाच तिच्या कार्यकर्तृत्वाची दखल लोकमत माध्यम समूहाकडून घेतली जात आहे. महिला सक्षमीकरणाचे धडे शालेय स्तरापासून गिरवल्यास भविष्यातील चित्र अधिक आशादायी असेल.- पंकज शर्मा, संचालक, लेक्सिकन ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटस

टॅग्स :PuneपुणेLokmat Eventलोकमत इव्हेंटWomenमहिलाLokmat Women Summitलोकमत वुमेन समीट