शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ स्टिंग; चार दिवसांत हजारो लिटर साठ्याची रात्री वाहतूक,कारवाईच्या धास्तीने कंपन्यांना कीटकनाशके परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 03:41 IST

शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली

सुरेंद्र राऊत यवतमाळ : शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली असून चार दिवसांत हजारो लिटर कीटकनाशके रात्री हलविण्यात आले. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून हे वास्तव उघडकीस आले.फवारणीच्या बळीनंतर मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाºयांनी यवतमाळात धाव घेतली. चौकशीत कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर यंत्रणा स्वत:ला निर्दोष असल्याचे दाखविण्यासाठी धडपड करत आहे. आतापर्यंत सात जणांवर कारवाई करून कृषी यंत्रणा पुन्हा थंडावली आहे. त्याचा फायदा कृषी सेवा केंद्रांनी कीटकनाशकांनी भरलेले गोदाम रिकामे करण्याचा सपाटा लावला आहे.दिवसभर दुकानाचे शटर बंद करून कीटकनाशकांचे पॅकिंग केले जाते. रात्री १० वाजेनंतर ती हलविली जातात. चार दिवसांपासून हा प्रकार सर्वत्र सुरू आहे. बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दत्त चौक परिसरात एका कृषी केंद्रासमोर एका मेटॅडोअरमध्ये कीटकनाशके भरली जात होती. चौकशी केल्यानंतर उरलेले बियाणे व कीटकनाशके कंपनीला परत पाठवित असल्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र शटर बंद करून काही लोक आतमध्ये पॅकिंगचे काम करीत होते. परंतु माहिती देताना त्यांची बोबडी वळल्याचे दिसत होते.कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित : कीटकनाशक विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू झाल्याने कंपन्यांचे मार्केटिंग अधिकारी, कर्मचारीसुद्धा यवतमाळात मुक्कामी होेते. त्यांच्याच सल्ल्यानुसार हा माल कंपन्यांकडे परत पाठविला जात आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी माल भरताना हे अधिकारीही तेथे उपस्थित होते. विशेष म्हणजे कारवाईच्या भीतीने अनेक मान्यताप्राप्त कीटकनाशकांचा साठा देखील कंपन्यांना परत पाठविण्याचा सपाटा लावला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार