लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात
By Admin | Updated: April 1, 2016 17:08 IST2016-04-01T17:08:34+5:302016-04-01T17:08:34+5:30
लोकमतने महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पुरस्कार सोहळ्याला मान्यवरांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १ - या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पुरस्कार सोहळ्याला मान्यवरांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.
पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, पार्श्वगायिका वैशाली सामंत, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, अॅडगुरू भरत दाभोळकर उपस्थित आहेत. लोकमत समूहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कला, क्रीडा, चित्रपट, रंगभूमी, विज्ञान, तंत्रज्ञान, बिझनेस, इन्फ्रास्ट्रक्चर, समाजकारण, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया लोकमतच्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोटय़वधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे.