शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Sarpanch Awards 2018 : संजयकुमार कोतकर यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’(पाणी) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:58 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (पाणी) हा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव गावचे सरपंच संजयकुमार विलासराव कोतकर यांना देण्यात आला. 

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (पाणी) हा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव गावचे सरपंच संजयकुमार विलासराव कोतकर यांना देण्यात आला. 

गट -पाणीसरपंचाचे नाव - संजयकुमार विलासराव कोतकरगाव - गुंडेगावतालुका - अहमदनगरजिल्हा - अहमदनगर

संजयकुमार यांनी कशाप्रकारे पाण्याचे नियोजन केले जाणून द्या....

गुंडेगाव हे दुर्गम डोंगरदऱ्यात वसलेले व निसर्गाचे वरदान लाभलेले गाव आहे. मात्र ते दुष्काळी गाव होते. रस्ते नाहीत, जमिनी भरपूर असल्या तरी त्यात पडीकच अधिक होत्या. शेतीसाठी वीजपुरवठा नीट नव्हता. पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. रोजंदारी तसेच रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह करण्याशिवाय गावक-यांना पर्याय नव्हता. २००५ सालानंतर गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येत ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजींचा आदर्श डोळ््यासमोर ठेवून गावाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. २००८ साली संजयकुमार विलासराव कोतकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानूसार गावाचा कायापालट कसा करायचा याचा आराखडा तयार करण्यात आला. गावातील कच्चे रस्ते तयार करुन त्याचे रुपांतर पक्क्या डांबरी रस्त्यात झाले. गावठाणात पडकेवाडे तसेच वेडी बाभळ यांनी अनेक अडथळे येत होते. त्यामुळे सर्व लोकांच्या संमतीने गाव सपाटीकरण कार्यक्रम ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आला. वर्ष २००९ ते २०१३ पर्यंत गावाला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्या दरम्यान पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. अशा परिस्थित ग्रामसभा घेऊन लोकसहभागातून गावातील शुढळा नदी तसेच कासारमळा नदीवरील अतिक्रमण दूर करणे, नदी सरळीकरण, नदी खोलीकरण, तलावातील गाळ काढणे अशी कामे सुरु करण्यात आली. ९ कि.मी. लांबीच्या नदीचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम ५८ लाख रुपये खर्चून लोकसहभागातून करण्यात आले. महाराष्ट्रशासनाचे जलयुक्त शिवार अभियान सुरु होण्याअगोदर जलसंधारणाचा गुंडेगाव पॅटर्न हा राज्यभर गाजला. २०१३पर्यंत गावातील वाड्यावस्त्यांना १३ शासकीय टँकरने पाणीपुरवठा करावा लागे. परंतु त्यानंतर गाव टँकरमुक्त झाले. महाराष्ट्र शासनाने २०१६-१७चा जलयुक्त शिवार अभियानाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार गुंडेगावाला दिला. त्याआधी वनक्षेत्रात केलेल्या योग्यनियोजन तसेच उत्कृष्ट कामांमुळे महाराष्ट्र शासनाचा सन २०१३-१४चा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार या गावास मिळालेला आहे. संत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानांतर्गतचा पुरस्कार, महात्मा फुले भूमी जलसंधारण अभियान अंतर्गतचा पुरस्कारही मिळाला आहे. वनक्षेत्रात लोकसहभागातून केलेल्या आदर्श कामांमुळे गुंडेगावची निवड महाराष्ट्र शासनाने ग्राम वन योजनेत केली आहे. हिवरे बाजार, राळेगण सिद्धीनंतर ग्रामवन योजनेत निवड होणारे गुंडेगाव हे राज्यातील तिसरे गाव आहे. ही सारी प्रगती सरपंच संजयकुमार विलासराव कोतकर व ग्रामस्थांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे झाली आहे.

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र