शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Lokmat Sarpanch Awards 2018 : नाथराव रामराव बंडे यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’(स्वच्छता) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 14:32 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी गावचे सरपंच नाथराव रामराव बंडे यांना प्रदान करण्यात आला. 

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी गावचे सरपंच नाथराव रामराव बंडे यांना प्रदान करण्यात आला. 

गट - स्वच्छतासरपंचाचे नाव - नाथराव रामराव बंडेगाव - चिमाची वाडीतालुका - उद्गीरजिल्हा - लातूर

गावात स्वच्छतेचे नियोजन...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील चिमाची वाडी हे साधारण साडेपाचशे लोकसंख्येचे लहानसे गाव! केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करण्यापूर्वीपासूनच या स्वछतेचा वसा घेतला आहे. पाणंदमुक्ती, प्लास्टीकमुक्ती असे उपक्रम नेटाने राबवित गावाने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावात ७९ घरे असून त्यांच्यासाठी ७९ शौचालयेही बांधण्यात आली आहे. त्यात पाच सार्वजनिक शौचालयांचाही समावेश आहे. गाव पाणंदमुक्त करण्यासाठी केवळ शौचालये बांधून चालत नाही, तरग्रामस्थांना त्याच्या नियमित वापराची सवयही लावणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंड बसविला. त्यामुळे हळूहळू लोकांच्या सवयींमध्ये बदल होऊन गाव १०० टक्के पाणंदमुक्त झाले. गावात आरओ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे ५ रुपये प्रति जार दराने ना नफा, ना तोटा तत्त्वावर पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येते. तसेच बंदिस्त गटारांद्वारे सांडपाणी शेतात सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याचा सिंचनासाठी पुनर्वापर होतो.गावाला २००५-०६ साली तत्कालीन राष्टÑपती डॉ. ण्. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गतही चिमाचीवाडीचा राज्यात तिसरा क्रमांक होता. तसेच यशवंत पंचायत राज पुरस्कार, स्वच्छ शाळा- सुंदर शाळा सानेगुरुजी पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, आण्णासाहेब खेडकर पुरस्कार, सलग तीन वेळा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार आदी पुरस्कारांनी गावाला गौरविण्यात आले आहे. याचे श्रेय सरपंच नाथराव रामराव बंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना आहे. 

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र