‘लोकमत प्रॉपर्टी व गुड होम शो’ हाऊसफुल्ल

By Admin | Updated: October 12, 2014 01:19 IST2014-10-12T01:19:50+5:302014-10-12T01:19:50+5:30

‘लोकमत प्रॉपर्टी आणि गुड होम शो’चा रविवार, १२ आॅक्टोबर अखेरचा दिवस असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील विविध उत्पादनांच्या स्टॉलवर लोकांनी माहिती जाणून घेत आहेत.

'Lokmat Property & Good Home Show' HouseFull | ‘लोकमत प्रॉपर्टी व गुड होम शो’ हाऊसफुल्ल

‘लोकमत प्रॉपर्टी व गुड होम शो’ हाऊसफुल्ल

उपराजधानीवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : नामांकित कंपन्यांचे स्टॉल, आज अखेरचा दिवस
नागपूर : ‘लोकमत प्रॉपर्टी आणि गुड होम शो’चा रविवार, १२ आॅक्टोबर अखेरचा दिवस असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील विविध उत्पादनांच्या स्टॉलवर लोकांनी माहिती जाणून घेत आहेत. हा शो सर्वोत्तम असल्याचे लोकांनी लोकमतला सांगितले.
शोमध्ये सोडतीतील विजेत्याला सोन्याचे नाणे देण्यात आले. तीन दिवसीय प्रॉपर्टी शो सिव्हिल लाईन्स येथील लेडिज क्लबच्या हिरवळीवर सुरू आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळात सुरू राहील. शोच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी शो सर्वोत्तम असल्याचा शेरा दिला होता. असे आयोजन सर्वत्र व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
प्रॉपर्टीच्या स्टॉलवर गर्दी
सामान्य लोकांचे मालकीचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. एक्स्पोचे सहप्रायोजक सुमंगल विहार आणि हार्मोनी अ‍ॅक असून वृंदावन, ग्रीन स्पेस इन्फ्रा, अथर्वनगरी, श्री अप्पास्वामी इन्फ्रास्ट्रक्चर हे सहयोगी प्रायोजक तर पिरॅमिड सिटी व पुष्कर होम्स हे प्रोत्साहनपर प्रायोजक आहेत. चार वर्षांपासून लोकमत प्रॉपर्टी शोचे आयोजन यशस्वीरीत्या करीत आहे. दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे.
नामांकित बिल्डर्सचे ४० स्टॉल
शोमध्ये शहरातील नामांकित बिडर्ल्स, डेव्हलपर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, सोलर उत्पादने आदींचे ४० स्टॉल आहेत. दोन भव्य डोम आहे. फूड कोर्टमध्ये स्वादिष्ट व्यंजनांची व्यवस्था आहे. एवढेच नव्हे तर आकर्षक आॅफर्स आणि किफायत दरात शासनातर्फे मंजूर प्रकल्पात फ्लॅट, रो-हाऊसेस, डुप्लेक्स, फार्म हाऊस, टाऊनशिपमध्ये विविध प्रकारचे युनिट विक्रीसाठी प्रदर्शित केले आहे. या माध्यमातून अधिकाधिक लोकांना लाभ आणि आवडीचे घरकुल खरेदीची संधी आहे. माहितीसाठी आतिश वानखेडे (९९२२४४४२८८), सोलोमन जोसेफ (९५५२५५६८३२), अक्षय कावळे (९५५२५५६८३२) आणि लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, २४२९३५५वर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
राजू सोनवणे यांना सोन्याचे नाणे
शोच्या दुसऱ्या दिवशी कुपनमधून काढण्यात आलेल्या भाग्यशाली सोडतीत सिव्हिल लाईन्स येथील राजू सोनवणे यांना सोन्याचे नाणे भेटस्वरूपात देण्यात आले. सोडत ग्रीन स्पेस इन्फ्राचे राजेंद्र मांडविया आणि नरेंद्र मांडविया यांनी काढली. पहिल्या दिवशी संगीता जीवतोडे यांना सोन्याचे नाणे देण्यात आले. प्रॉपर्टी शोच्या प्रवेशद्वारावर असलेल्या आकर्षक स्टॉलवरून शोमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला कुपन देण्यात येत आहे. नाव, पत्ता आणि अन्य आवश्यक माहिती लिहून ते एका बॉक्समध्ये टाकायचे आहे.

Web Title: 'Lokmat Property & Good Home Show' HouseFull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.