शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत पॉवर आयकॉन पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 20:50 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई  - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत पक्षाला योग्य दिशा दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.    'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. शिवसेना पक्षप्रमुखपदाची धुरा सांभाळताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे कुशलपणे नेतृत्व केले आहे. तसेच कठीण काळामध्ये पक्षाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. एकीकडे सत्तेत असतानाच शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्वावर सरकारला धारेवर धरण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. नुकत्याच झालेल्या शिवसेना आणि भाजपा युतीच्यावेळीही त्यांनी जनतेच्या हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य मिळेल, अशी भूमिका घेतली होती. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना यावर्षीचा लोकमत पॉवर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. 

हे होते परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर हे परीक्षक मंडळ होतं.  

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र