शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: घरी कोण बॉस, कोण डिसिजन मेकर; सांगताहेत फडणवीसांच्या होम मिनिस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:40 IST

मिस्टर आणि मिसेस फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत

मुंबई: माणूस घराबाहेर कोणीही असला, कितीही मोठा असला, तरी घरात बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्यालाच सॉरी म्हणावं लागतं, असा घरगुती किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. अभिनेता रितेश देशमुखनं लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात या दोघांनी अनेक गोष्टींवर अगदी दिलखुलासपणे भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मात्र घरात कोणाचा दरारा अधिक आहे, असा प्रश्न रितेशनं विचारला. यावर घरात ते बॉस आहेत. पण मी डिसिजन मेकर आहे, असं स्मार्ट उत्तर अमृता यांनी दिलं. यानंतर तुम्हाला आता कळलंच असेल, मी काय भोगतो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विशेष म्हणजे कार्यक्रमाला हजर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील यांनाही हसू आवरता आलं नाही. देवेंद्र फडणवीस किती रोमँटिक आहेत, असा प्रश्नही यावेळी मिसेस चीफ मिनिस्टरना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र यांना काहीच माहित नसतं. मी नवा ड्रेस घातला आहे. जाड झाले आहे, बारीक झाली आहे का, याकडे त्यांचं लक्षच नसतं, अशी तक्रार अमृता यांनी केली. देवेंद्र यांचं अपहरण करुन त्यांना कुठे घेऊन जाल, असा प्रश्न रितेशनं अमृता यांना विचारला. या प्रश्नाला तुमच्याच घरी आणेन. नवरा बायको एकमेकांशी कसे वागतात हे त्यांना कळेल, असं उत्तर अमृता यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी झाल्यानंतर तुम्ही प्रकाशझोतात आलात, असं वाटतं का, असं रितेश देशमुखनं विचारताच मी आधीही काम करत होते, मात्र प्रकाशझोतात आता आले. आता जितकं कौतुक होतं, तितकीच टीकादेखील होते, अशी मन की बात अमृता यांनी सांगितली.लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इयर 2019 सोहळा आज वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये संपन्न झाला. या सोहळ्याचं हे सहावं वर्ष होतं. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांचा या सोहळ्याच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसRitesh Deshmukhरितेश देशमुख