LMOTY 2019: तुमच्या बायोपिकमध्ये कोणी काम केलेलं आवडेल; मुख्यमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:00 AM2019-02-21T00:00:03+5:302019-02-21T16:31:52+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत

lokmat maharashtrian of the year 2019 cm devendra fadnavis reacts on biopic on him | LMOTY 2019: तुमच्या बायोपिकमध्ये कोणी काम केलेलं आवडेल; मुख्यमंत्री म्हणतात...

LMOTY 2019: तुमच्या बायोपिकमध्ये कोणी काम केलेलं आवडेल; मुख्यमंत्री म्हणतात...

Next

मुंबई: सध्या अनेक व्यक्तीमत्त्वांच्या आयुष्यावर बेतलेले चित्रपट येत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नुकतेच येऊन गेले. त्यामुळेच लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या आयुष्यावर चित्रपट आला, तर त्यात तुमची भूमिका कोणी साकारलेली आवडेल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना अभिनेता रितेश देशमुखनं विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी अगदी स्मार्ट उत्तर दिलं. 

साडेचार वर्ष तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. लवकरच तुम्ही पाच वर्षे पूर्ण करणारे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठराल. तुमच्या आयुष्यावर चित्रपट आल्यास, त्यात कोणत्या अभिनेत्यानं तुमची भूमिका केलेली आवडेल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर कर्तृत्वानं तितका मोठा झालो की बायोपिक करता येईल, असं उत्तर त्यांनी दिलं. 'माझं कर्तृत्व फार मोठं नाही. मी कर्तृत्वानं तितका मोठा झाल्यावर बायोपिकचा विचार करु,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बायोपिकवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्मिक टोलादेखील लगावला. माझं कर्तृत्व फार मोठं नाही. त्यामुळे बायोपिक नाही. तोपर्यंत सध्या चला हवा येऊ द्या ठीक आहे. त्यात भाऊ कदम जी मिमिक्री करतात, तिच राहू दे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इयर 2019 सोहळा आज वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये संपन्न झाला. या सोहळ्याचं हे सहावं वर्ष होतं. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांचा या सोहळ्याच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.

Web Title: lokmat maharashtrian of the year 2019 cm devendra fadnavis reacts on biopic on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.