शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
3
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
4
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
5
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
6
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
7
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
8
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
9
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
10
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
11
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
12
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
13
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
14
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
15
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
16
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
17
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
18
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
19
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
20
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर; चित्रपट क्षेत्र गाजवणाऱ्या कलाकारांचा करा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 4:37 PM

चित्रपट (पुरुष) या विभागातील नामांकनासाठी पुढील यादीमधील कलाकार आपण निवडू शकता.

मुंबई- गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या विविध मराठी चित्रपटांमधील अभिनेत्यांना निवडण्यासाठी आपण http://lmoty.lokmat.com/vote.php येथे मत नोंदवू शकता. चित्रपट (पुरुष) या विभागातील नामांकनासाठी पुढील यादीमधील कलाकार आपण निवडू शकता.अमेय वाघ, फास्टर फेणे, अभिनयअमेय वाघ सध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याच्या अभिनयावर सगळेच फिदा आहेत. त्याने आजवर ‘फास्टर फेणे’, ‘मुरंबा’, ‘शटर’, ‘पोपट’ यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अमेय वाघचा सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास अतिशय इंटरेस्टिंग आहे. अमेयने आपल्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. बालनाट्यापासून सुरुवात करता-करता अमेय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवू लागला आणि पुढे त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. पुढे अभिनयाच्या जोरावर मालिका आणि सिनेमे त्याला मिळत गेले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने अमेयला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या मालिकेमुळे तो एक चांगला नायक असल्याची सगळ्यांना खात्री पटली आणि मराठी चित्रपटसृष्टीची दारे त्याच्यासाठी उघडली. अमेय वाघने ‘फास्टर फेणे’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटात सिक्सर मारला आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ‘फास्टर फेणे’ची कथा ही जुनी असली, तरी अमेयने आपल्या अभिनयाने यात नावीन्य आणले. या चित्रपटात तो बन्या या कॉलेज युवकाच्या भूमिकेत झळकला. परीक्षेच्या हॉलमध्ये त्याला एक अतिशय हुशार मुलगा भेटतो, पण त्या मुलाने आत्महत्या केली असल्याची बातमी तो दुसºया दिवशी वर्तमानपत्रात पाहतो. तो मुलगा आत्महत्या करू शकत नाही, असा बन्याला विश्वास असल्याने तो या गोष्टीचा छडा लावण्याचे ठरवतो. हे सगळे करत असताना, त्याला शिक्षण क्षेत्रातील अनेक चुकीच्या गोष्टी कळतात आणि त्यानंतर तो या सगळ्या लोकांसमोर कशा प्रकारे आणतो, हे आपल्याला ‘फास्टर फेणे’ या चित्रपटात पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची उकल करण्याची आवड असलेल्या बन्याच्या भूमिकेत अमेय भाव खाऊन गेला आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे. हा चित्रपट अमेयचा पहिला चित्रपट आहे, असे चित्रपट पाहाताना आपल्याला कुठेच जाणवत नाही.अमेय वाघ यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.phpललित प्रभाकर - चि. व चि. सौ. कां, अभिनयललित प्रभाकरने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ललित मोठ्या पडद्याकडे वळला. त्याने चि. व चि. सौ. कां. या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी तितकीच पसंती दिली. चि. व चि. सौ. कां. या चित्रपटाची कथा सत्यप्रकाश आणि सावित्री या जोडप्याभोवती फिरते. सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर आणि पराकोटीची प्राणिप्रेमी, तर सत्यप्रकाश हा इलेक्ट्रिकल इंजिनीअर आणि टोकाचा पर्यावरण प्रेमी असतो. दोघेही विचारांवर ठाम आणि कामात मग्न असतात, पण तरीही घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला दोघेही मान्यता देतात आणि एकमेकांना पाहतातदेखील, पण लग्नाआधी काही दिवस एकत्र राहण्याची अट ते आपल्या घरातल्यांसमोर ठेवतात. त्यानंतर, त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांची एकच भंबेरी उडते. ते दोघे एकत्र राहिल्या लागल्यानंतर काय धमाल उडते, हे प्रेक्षकांना चि. व चि. सौ. कां. या चित्रपटात पाहायला मिळते. ललित प्रभाकरने सत्यप्रकाश ही व्यक्तिरेखा खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. सत्यप्रकाश त्याने आपल्या अभिनयाने विलक्षण खराखुरा उभा केला आहे. ललितचा हा पहिलाच चित्रपट असला, तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.ललित प्रभाकर यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

प्रसाद ओक, कच्चा लिंबू, दिग्दर्शकअभिनेता प्रसाद ओकने आजवर सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शकासोबतच प्रसाद एक उत्तम लेखक आहे, एक उत्तम गायक आहे, तसेच एक खूप चांगला सूत्रसंचालक आहे. ‘बंदिनी’, ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाची संसार’, ‘पिंपळपान’, ‘होणार सून मी या घरची’, ‘फुलपाखरू’ अशा अनेक मालिकांमधून प्रसादने मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रसाद ओकने अनेक चित्रपटांतमध्ये बहुरंगी, बहुढंगी भूमिका साकारल्या आहेत. अभिनय क्षेत्रात मिळालेल्या यशानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने काही वर्षांपूर्वी त्याचा जीवलग मित्र पुष्कर श्रोतीसोबत ‘हाय काय नाय काय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा एक कॉमेडी चित्रपट होता. दरम्यानच्या काळात प्रसाद अभिनय क्षेत्रात व्यग्र असल्याने त्याला दिग्दर्शनासाठी वेळ देता आला नाही, पण ‘कच्चा लिंबू’ या एका वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा एकदा पाऊल ठेवले. कथा, कादंबºयांतून सर्वसामान्यांचे जीवन रेखाटणारे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. प्रसादच्या या नव्या इनिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटामुळे एक दिग्दर्शक म्हणून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चा एक ठसा उमटविला आहे. ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटात जुन्या काळातल्या मुंबईमधल्या गिरगावच्या चाळीत राहणाºया अस्सल मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा पाहायला मिळते. मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याचा बच्चू हा मुलगा ‘स्पेशल चाइल्ड’ असतो. हा बच्चू गतिमंद असला, तरी ऐन वयात आलेल्या बच्चूला त्याचे शरीर स्वस्थ बसू देत नाही. बच्चूसाठी स्वत:च्या वैवाहिक जीवनाकडे कळत नकळत दुर्लक्ष झालेल्या जोडप्याची आणि त्यांच्या या मुलाची कथा या चित्रपटात पाहायला मिळते. या कथेची मांडणी प्रसादने एक दिग्दर्शक म्हणून खूपच चांगल्या प्रकारे केली आहे. प्रसाद ओक यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

सचिन खेडेकर, बापजन्म, अभिनयसचिन खेडेकर यांनी आज मराठीतच नव्हे, तर हिंदी चित्रपट, मालिकांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. टीव्ही या माध्यमाने सचिन खेडेकर यांना खरी ओळख मिळवून दिली. ‘सैलाब’, ‘थोडा है थोडे की जरूरत है’, ‘टीचर’ यांसारख्या त्यांच्या अनेक हिंदी मालिका गाजल्या. सचिन खेडेकर यांनी ‘आपली माणसे’, ‘चिमणी पाखरे’, ‘लालबाग परळ’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘काकस्पर्श’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा अनेक मराठी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आज त्यांनी बॉलीवूडमध्येदेखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर सचिन खेडेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारल्या आहेत, पण ‘बापजन्म’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळे सचिन खेडेकर पाहायला मिळाले. आपल्या मुलांपासून दुरावलेल्या वडिलांची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. ‘बापजन्म’ या चित्रपटात बाप-मुलाच्या नात्याची गंभीर गोष्ट मजेशीररीत्या मांडलेली आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी भास्कर पंडित ही भूमिका साकारली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर ते एकट्यानेच आपले आयुष्य जगत असतात. आपल्या दोन्ही मुलांशी त्यांचा काहीही संपर्क नसतो. पंडित यांना कॅन्सर झाला असून, वर्षभरात त्यांचा मृत्यू होणार असल्याचे त्यांना कळते. आपल्या शेवटच्या क्षणात आपल्या मुलांना भेटण्याची त्यांना ओढ लागते. ते मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्नदेखील करतात, पण मुलांचा म्हणावा तसा त्यांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ते त्यांच्याच मरणाचे नाटक करतात. अतिशय गंभीर विषय खूपच चांगल्या रीतीने या चित्रपटात मांडण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटात आपल्याला सचिन खेडेकर एका मजेशीर भूमिकेत पाहायला मिळतात. आपल्याच मृत्यूचे नाटक करून, आपल्या घरात आपल्या मृत्यूनंतर काय काय घडते, हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहाणाऱ्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या सचिन खेडेकरांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. सचिन खेडेकर यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

सुमित राघवन - आपला मानूस, अभिनयसुमित राघवनने ‘फास्टर फेणे’पासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘हद कर दी आपने’, ‘तू तू मैं मैं’ या मालिकांमध्ये काम केले, पण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील साहील या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने ‘माय नेम इज खान’, ‘हॉलिडे’ यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सुमितने मराठी चित्रपटांमध्येदेखील दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘आपला मानूस’ या चित्रपटात सुमित राघवनने राहुल ही भूमिका साकारली आहे. राहुलच्या वडिलांचा एक अपघात घडतो. या अपघाताची चौकशी करण्याची जबाबदारी क्राइम ऑफिसर नागरगोजेवर टाकली जाते. राहुल आणि त्याच्या पत्नीशी बोलून अपघाताच्या रात्री काय घडले होते, याविषयी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्या दोघांची चौकशी केल्यानंतर, राहुलच्या बाबांनी आत्महत्या केली आहे किंवा राहुल, राहुलच्या पत्नीने त्यांचा खून केला आहे, अशा तीन निकषांवर नागरगोजे पोहोचतात. त्या रात्री राहुलच्या बाबांसोबत काय घडले, याचा शोध लावत असताना बाप-मूल आणि सुनेच्या नात्यातील गुंतागुंत क्राइम ऑफिसर नागरगोजे यांना कळते. त्यांच्या नात्यातील असलेला कडवटपणा क्राइम ऑफिसर नागरगोजे कसा दूर करतो, हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. आजच्या पिढीला आपल्या पालकांसाठी वेळ नाहीये. उतारवयात पालकांना पैशापेक्षा आपल्या मुलाने दोन शब्द आपुलकीने बोलावे असे वाटत असते. त्यामुळे त्यांना वेळ द्या हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. सुमितने या चित्रपटात रंगवलेली राहुल ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले. त्याने त्याच्या अभिनयातून आणि देहबोलीतून राहुल ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली आहे.सुमित राघवन यांना मत देण्यासाठी -http://lmoty.lokmat.com/vote.php 

टॅग्स :Lokmat Maharashtrian Of The Year 2018लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८Maharashtraमहाराष्ट्र