LMOTY 2025: महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, स्टार्टअप या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी...
अल्ताफ सैय्यद, सलोनी आनंद(सहसंस्थापक, तत्वार्थ हेल्थ प्रा. लि.)
- कंपनीचे स्थापना वर्ष - २०२०
- कंपनीची उलाढाल ३५० कोटी
कंपनीची सद्यःस्थिती
- केसगळती रोखण्यासाठी उत्तम वैद्यकीय सुविधा देणाऱ्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे.
- आयुर्वेद, डर्मेटॉलॉजी आणि न्यूट्रिशन यांच्या एकत्रित वापरातून केसगळती रोखण्यासाठी कंपनी प्रामुख्याने काम करते.
- कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना ग्राहक केंद्रित सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.
- कंपनीच्या पॅनलवर सध्या ६६ डॉक्टर असून कंपनीला अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
ध्वनील शेठ (संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्किलमॅटिक्स)देवांशी केजरीवाल (सहसंस्थापक, मुख्य उत्पादन अधिकारी, स्किलमॅटिक्स)
- कंपनीचे स्थापना वर्ष - २०१७
- कंपनीची उलाढाल ५०० कोटी रुपये इतकी आहे. कंपनीने १९९ कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे.
- अभ्यासपूर्ण आणि रुची वृद्धिंगत करणाऱ्या विविध प्रकारच्या खेळांची निर्मिती करण्यात कंपनीने जगात आपला ठसा उमटवला आहे.
- भारताइतकेच कंपनीचे भक्कम अस्तित्व अमेरिका आणि युरोपातील देशात आहे.
- वॉलमार्ट, टार्गेट, हॅमलेज, हॉबी लॉबी या आणि अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रेडच्या दुकानांतून कंपनीच्या खेळण्यांची २० हजारांपेक्षा जास्त दुकानांतून विक्री होते.
सिद्धार्थ गाडिया (सह-संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी)गिरीश अग्रवाल (सह-संस्थापक आणि संचालक)झेनो हेल्थ
- कंपनीचे स्थापना वर्ष - २०१७
- कंपनीची उलाढाल २०० कोटी
- भांडवल उभारणी - ४३० कोटी
- वैद्यकीय औषधांच्या वितरणातील सर्व
- माध्यमांचा वापर करत ग्राहकांना परवडणाऱ्या दरात औषधे देण्याच्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे.
- विविध आजारांसाठी ६० टक्के कमी किमतीने जेनेरिक औषधे कंपनी उपलब्ध करून देते.
- महिन्याकाठी १ कोटीपेक्षा जास्त लोकांना कंपनीच्या सेवेचा फायदा होत आहे.
- स्वस्त औषधांमुळे ३० लाखांपेक्षा जास्त लोकांची औषध खरेदीत हजार रुपयांची बचत झाली.
सिद्धार्थ शाह(संस्थापक, अध्यक्ष, एसएस कम्युनिकेशन अँड सव्हिसेस प्रा.लि.)
- कंपनीचे स्थापना वर्ष - २००४
- आज कंपनीची ३०० पेक्षा जास्त दुकाने आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल २ हजार कोटी रुपये इतकी आहे.
- कंपनीचे ६० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. कंपनीचे मूल्यांकन १३०० कोटी रुपये इतके आहे.
- २०२५ या वर्षामध्ये कंपनीचा आयपीओ येणार आहे.
- आजच्या घडीला कंपनीचा विस्तार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात झालेला आहे. ४ राज्ये, ४० जिल्हे आणि १८० शहरांतून कंपनी कार्यरत आहे.
विशाल शाह(संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक, स्टोरिया फूडस अँड बेव्हरेजेस प्रा.लि.)
- कंपनीचे स्थापना वर्ष मार्च २०१७
- कंपनीची उलाढाल १७० कोटी
- भारतात शीतपेयांची बाजारपेठ १९ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. या बाजारपेठेत आरोग्यदायी पेय कंपनीने सादर केले आहेत.
- नारळाचे पॅकेजड़ पाणी यामध्ये कंपनी देशात अग्रेसर आहे. विविध प्रकारचे रसायनविरहित शेक, ज्यूस आदीच्या निर्मितीमध्ये कंपनीने ठसा उमटवला आहे.
- याकरिता कंपनीने आपल्या निर्मितीमध्ये पीईटी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला आहे.
- आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीची आर्थिक उलाढाल ३६ कोटी रुपये इतकी होती.
- आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १७० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
ज्यांची नामांकने झाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/