शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

LMOTY 2025: हे चेहरे गाजवणार महाराष्ट्राचं पुढचं राजकारण; कोण ठरणार प्रॉमिसिंग राजकारणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 21:18 IST

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, राजकारण (प्रॉमिसिंग) या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....

अदिती तटकरे(महिला व बालकल्याण मंत्री, राष्ट्रवादी -काँग्रेस अजित पवार गट, रायगड)- सलग दुसऱ्यांदा आमदार. २०१८ साली वरसे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून निवड.- मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री. शिंदे-भाजप सरकारच्या काळात महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत मोठा सहभाग.- महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असताना जिल्ह्याचे महत्त्वाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले.

अमीन पटेल(आमदार, काँग्रेस, मुंबई)- राज्य सरकारच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे २००७-२०१४ अध्यक्ष.-  या काळात विविध योजनांचा सुमारे ३५,००० अल्पसंख्याक कुटुंबांना लाभदिला. सलग चार वेळा मुंबादेवी मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी.- पूर्वी पुनर्विकसित सदनिका केवळ 200 चौरस फुटांच्या मिळत होत्या, सतत पाठपुरावा केल्याने पुनर्विकास प्रकल्पात किमान ३०० चौरस फूट सदनिका मिळवून देण्यात यश.- म्हाडा दुरुस्ती मंडळात १६,००० जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची निधीच्या कमतरतेमुळे दुरुस्ती होत नव्हती, केवळ १०० कोटींचा निधी देऊन त्यांचे काम प्राधान्याने हाती घेतले. 

मुरलीधर मोहोळ(केंद्रीय राज्यमंत्री,भाजप, पुणे)- भाजपचा पोलिंग एजेंट ते केंद्रीय मंत्री असा प्रवास. कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी नाही.-  गेल्या ३० वर्षांत पक्षाने दिलेली जबाबदारी निभावणारा कार्यकर्ता ही ओळख, तीन वेळा नगरसेवक, पुण्याचे महापौर आणि खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्री.- भाजपचे संघटनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले प्रदेश सरचिटणीस पद मिळाले. संघटनेतून आलेला कार्यकर्ता असल्याने मोहोळ यांच्या कार्यपद्धतीत केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही कोणताही फरक पडला नाही.- अफाट जनसंपर्क, प्रश्न सोडवण्याची हातोटी, संघटना हाताळण्याचे कौशल्य यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर.

डॉ. पंकज भोयर(गृहराज्यमंत्री, भाजप, वर्धा)- सन २०१४ पासून सतत तीनदा आमदार. सध्या राज्याचे गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म, शालेय शिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री.- राज्यात प्रथम 'सेवा पंधरवडा' सुरू करून एकाच छताखाली नागरिकांची विविध कामे मार्गी लावली.- गृहराज्यमंत्री म्हणून पोलिसांच्या कुटुंबीयांशी 'संवाद' उपक्रमाद्वारे चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे.- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.- डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी भरीव प्रयत्न. 

प्रकाश आबिटकर(आरोग्यमंत्री, शिवसेना - शिंदे गट, कोल्हापूर)- कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी नाही, राजकारणात गॉडफादर नाही. सहकारी संस्था, फारशी आर्थिक ताकद नसूनही सलग तीन वेळा निवडून येण्याचा इतिहास.- तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद.- कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आजपर्यंत सलग तीन वेळा आमदार, कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद वाट्याला येणारे ते एकमेव.- मतदारसंघात रस्ते, आरोग्य सुविधा, पाटबंधारे प्रकल्पाच्या पातळीवर चांगले काम. मागच्या दहा वर्षात एवढे काम केले की, आता नागरी सुविधांचे फारसे काम शिल्लक नाही.

स्नेहा दुबे(आमदार, भाजप, विरार, जि. पालघर)- वसई-विरारमध्ये गेली ३५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, समाजसेवक विवेक पंडित यांच्या त्या कन्या.-  उच्चशिक्षण घेत वकिलीची पदवी (एलएलबी). न्यायाधीश पॅनेलच्या सदस्य म्हणूनही काम.- वाडा आणि विक्रमगडसारख्या दुर्गम भागांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ३०० बचत गट स्थापन करुन तब्बल तीन हजार महिलांना रोजगार दिला.- आई सन्मान मोहिमेतून स्वतःच्या मुलांच्या नावापुढे आईचे नाव नोंदवले आणि राज्यभरात हा विचार रुजवला, या मोहिमेला सरकारनेही मान्यता दिली.ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/ 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्र