शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

LMOTY 2025 : वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे 'पंचरत्न'; कोण होईल महाराष्ट्रीयन ऑफ द इयर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:53 IST

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 : महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, वैद्यकीय/उर्वरित महाराष्ट्र या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....

डॉ. अश्विन पोरवाल (कोलोरेक्टल सर्जन, हिलिंग हँडस - पुणे)- १७ वर्षांपासून हिलिंग हँड हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा. ४० हजारांहून अधिक रुग्णांवर मूळव्याधासंबंधित समस्येवर यशस्वी उपचार. अतिशय गुंतागुंतीच्या भगंदरासाठी जगातून रुग्ण येतात.- २००९ साली भारतातील पहिली STARR शस्त्रक्रिया. एम आर आय डीफॅकोग्राफी ही डायग्नोस्टिक टेस्ट पुण्यात त्यांनी केली. STARR व Stapler शस्त्रक्रिया संपूर्ण आशिया खंडात दर महिन्याला सर्वाधिक प्रमाणात डॉ. पोरवाल यांच्या नावे.- भारतात प्रथमच पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स सस्पेन्शन सर्जरी (पी ओ पी एस) वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार, जैन इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन,- नवीन शोध व तंत्रज्ञान :- डॉ पोरवाल यांचे डिलपीएल टेक्निक जे अतिशय गुंतागुंतीच्या फिस्तुलासाठी त्यांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. यांच्या नावावर अनेक पेटंट.

डॉ. पराग कुमठेकर (सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट -कुमठेकर रुग्णालय, सोलापूर)- १३ वर्षापासून कार्यरत असून सोलापूर येथील विविध रुग्णालयांत ते शस्त्रक्रिया करत आहेत.- ३५०० पेक्षा अधिक स्तन कर्करोगांवर यशस्वी शस्त्रक्रिया. स्तनाच्या मूळ आकाराला धक्का न लावता उपचार करण्यावर अधिक भर.- कर्नाटक, तेलंगणा आणि आंध प्रदेशातील शेकडो पेशंटवर उपचार.- स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरवर संशोधन करीत आहे.- एमबीबीएस - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर. एम एस -जे जे रुग्णालय, एम सी एच - टाटा रुग्णालय.

डॉ. प्रमोद गिरी (न्यूरो सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर)- न्यूरो सर्जरी विभागप्रमुख म्हणून कार्यरत.- मेंदूशी निगडित तब्बल ३३ हजार शस्त्रक्रिया, यामधील यात १७ हजार कॅनियल, ११ हजार स्पाइन व पाच हजार पेडियाट्रिक शस्त्रक्रियांचा समावेश.- वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत गौरव. • महाविद्यालयातील प्रसिद्ध अशा ओव्हल गार्डनच्या कायापालटासाठी पुढाकार.- कुटुंब उदध्वस्त करणारे रस्ते अपघात, त्यातील तरुणांचे बळी रोखण्यासाठी जनजागृतीचे विशेष अभियान.- शालेय अभ्यासक्रमात जनजागृतीचा धड़ा समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत.

डॉ. सचिन खत्री (डेंटिस्ट - शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर)- विभागप्रमुख, सामाजिक देतशास्त्र विभाग येथे कार्यरत. गडचिरोलीत २३ हजार मुलांच्या मुखाची तपासणी केली, यामधील ३ हजार ४८७ (१५ टक्के) मुलांमध्ये मुख पूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार.- ८१२ मुलांवर शस्त्रक्रिया तर २ हजार ६०० विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले. तंबाखू व्यसनाबाबत जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांना प्रबोधन केले आहे.- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये 'जागतिक मौखिक आरोग्य दिन उत्सव'साठी पहिले आणि जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्सवसाठी पहिल्या पारितोषिकाने सन्मानित.- आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 'ब्लॉसम' उपक्रमांतर्गत विदर्भातील ८ हजार आदिवासींचा अभ्यास करण्यात आला, त्यामध्ये संशोधक म्हणून काम पाहिले.

डॉ. उत्क्रांत कुर्लेकर (जनरल सर्जन -दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे)- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे सल्लागार सर्जन आणि ऑन्कोसर्जन म्हणून कार्यरत.- ३३ वर्षे जनरल सर्जन म्हणून काम करताना २५०० रुग्णांवर कॅन्सर शस्त्रक्रियासुद्धा केल्या.- एक हजारापेक्षा जास्त रुग्णांवर वजन कमी करण्यासाठी लागणारी बॅरियाट्रिक सर्जरी केली आहे.- २४ वर्षे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.- आरोग्य जनजागृतीसाठी ७५ पेक्षा अधिक हाफ मॅरेथॉन आणि १४ फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग. अमेरिका येथील ड्युक्स विद्यापीठातून बॅरियाट्रिक सर्जरीचे प्रशिक्षण,

ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://lmoty.lokmat.com/

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024doctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र