शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

LMOTY 2022: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नाना पाटेकर काय प्रश्न विचारणार? आज महाराष्ट्राची महामुलाखत रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 10:59 IST

‘लोकमत’च्या व्यासपीठावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : समाजाच्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार सोहळा आज (मंगळवार, ११ ऑक्टोबर) मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे रंगणार आहे. कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत हे या गौरव सोहळ्यातील कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. विख्यात अभिनेते नाना पाटेकर हे या दोन्ही दिग्गज नेत्यांची मुलाखत घेणार आहेत. या दोघांनाही नाना पाटेकर कोणती गुगली टाकणार आणि हे दोन्ही कसलेले नेते त्याचा कसा मुकाबला करणार? याकडे राज्याचे लक्ष लागले नसेल तरच नवल. 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कियारा अडवाणी, लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल यांच्याशी होणारा विशेष संवाददेखील कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहे. तर, या पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राज्याच्या विविध भागांतील आमदार, खासदार, अनेक उच्चपदस्थ सनदी अधिकारी, चित्रपट, नाटक, समाजकारण, अर्थकारण, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अशी विविध क्षेत्रांतील दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे.

अनेक वर्षे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्याची अनेक क्षेत्रांतील मान्यवर कायम वाट पाहत असतात. लोकसेवा - समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन - आयएएस प्रॉमिसिंग, आयपीएस प्रॉमिसिंग, सीएसआर, कृषी आणि राजकारण या क्षेत्रांत उत्तम कार्य करणाऱ्यांचे नॉमिनेशन केले जाते. त्यासाठी मान्यवर ज्युरी आणि जगभरातील ‘लोकमत’चे वाचक ऑनलाइन पद्धतीने मतदान करतात. त्यातून विजेत्यांची निवड केली जाते. या समारंभाच्या मोफत प्रवेशिका ‘बुक माय शो’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासन आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच सारस्वत बँक या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून बीकेटी, एमआयडीसी आणि सिडको कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022Nana Patekarनाना पाटेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे