शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

लोकांचे काम पाहिले आणि सगळेच विजेते वाटू लागले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:49 IST

Lokmat Maharashtrian of the Year Award : सकारात्मकतेचा प्रसार करण्याचे काम लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार करत आहे - ज्युरी मंडळाच्या प्रतिक्रिया

मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा केवळ एक पुरस्कार नाही, तर समाजात प्रेरणादायी आणि सकारात्मकतेचा प्रसार करणारे ते एक लोकहिताचे कार्य आहे,’ असा सूर लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या परीक्षक मंडळाच्या बैठकीत मान्यवर परीक्षकांनी व्यक्त केला.

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ची ज्युरी मीटिंग उत्साहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल होते. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी प्रत्येक कॅटेगरीसाठी नॉमिनीची निवड कशा पद्धतीने केली जाते, याची माहिती दिली. वेगवेगळ्या क्षेत्रांतील गुणवंतांना सगळ्यांत आधी ‘लोकमत’ने शोधले आणि नंतर त्यांना वेगवेगळ्या स्तरांवरचे पुरस्कार मिळाले याची अनेक उदाहरणे यावेळी ऋषी दर्डा यांनी दिली.  प्रत्येक कॅटेगरीवर चर्चा होऊन विजेत्यांची निवड केली गेली. चार तास ही बैठक सुरू होती. वाचकांनी केलेल्या मतदानाची आकडेवारी ज्युरींना देण्यात आली. 

परीक्षक मंडळात काम करताना मला अतिशय आनंद झाला. अतिशय सार्थ चर्चा झाली. काही मुद्द्यांवर एकमत तर काही मुद्द्यांवर बहुमत होते, पण चर्चा सकस झाली. ज्या उमेदवारांच्या शिफारशी आल्या होत्या, त्या सर्व व्यक्ती उत्तुंग काम करत आहेत. विजेते असोत वा शिफारशी आलेल्या व्यक्ती असोत, हे सर्वच लोक महाराष्ट्राच्या विकासयात्रेत योगदान देत आहेत. या शिफारशी निवडण्यासाठी ‘लोकमत’च्या चमूने सखोल काम केले. विजय दर्डा आणि ऋषी दर्डा यांचे विशेष अभिनंदन. सर्वांना शुभेच्छा.पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री

नकारात्मक गोष्टीपेक्षा चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक व्हावे, त्यांचा सन्मान केला जावा, म्हणून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. या पुरस्कारामुळे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांत चांगले काम करण्याची स्पर्धा निर्माण झाली हे या पुरस्काराचे मोठे यश आहे. पुरस्कारासाठी ज्यांचे नॉमिनेशन होते ते आमच्यासाठी विजेतेच असतात. त्यांच्या कामामुळे आम्हाला कायम प्रेरणा मिळत असते.डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एरिटोरियल बोर्ड

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार बहुचर्चित आणि प्रोत्साहन देणारा आहे. अशा पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना तर प्रोत्साहन मिळतेच; पण यामुळे समाजातील इतर लोकांनादेखील यातून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. जे विजेते झाले त्यांचे तर अभिनंदन आहेच; पण ज्यांची निवड होऊ शकली नाही, त्यांनाही मी शुभेच्छा देत आहे. अत्यंत समाजोपयोगी असा हा उपक्रम राबवत असल्याबद्दल ‘लोकमत’चे विशेष अभिनंदन...!राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

या पुरस्कारासाठी विविध श्रेणीत अनेक लोकांच्या शिफारसी आल्या होत्या. त्यामुळे परीक्षक मंडळाला त्यातून निवड करणे हे अतिशय आव्हानात्मक होते, पण ज्या लोकांच्या शिफारसी आल्या आणि त्यांचे काम पाहिल्यावर मला वाटते की, ज्या ज्या लोकांच्या शिफारसी आल्या ते सर्वच विजेते होते.

हर्ष जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक, ड्रीम-११ समूह‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या परीक्षक मंडळात मी परीक्षक म्हणून काम पाहिले. काही पुरस्कार निवडताना परीक्षक मंडळाचे तातडीने एकमत झाले, तर काही पुरस्कारांच्या निवडीसाठी मतमतांतरेदेखील झाली. मात्र, हा एक विलक्षण अनुभव होता.

मनीषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्रपोलिस दलातील अधिकारी किती चांगले काम करतात, याची माहिती अशा पुरस्कारांमुळे समाजाला मिळते. पोलिसांबद्दल समाजाच्या मनात असलेली नकारात्मकतेची भावना दूर होण्याचे काम अशा पुरस्कारामुळे होते आणि पोलिस दलात नव्याने भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अशा पुरस्कारांमुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.

मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबईपुरस्काराच्या परीक्षक मंडळाचा मी एक भाग होतो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. समाजात विविध क्षेत्रांत लोक किती वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत, याची जाणीव मला परीक्षक म्हणून काम करताना झाली. विजेत्यांची निवड करताना परीक्षक मंडळात साधकबाधक चर्चा झाली. मतमतांतरे झाली. त्यातून आम्ही विजेते निवडू शकलो.

नीलकंठ मिश्रा, मुख्य अर्थतज्ज्ञ, ॲक्सिस बँकलोकमत समूहाने गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेला हा एक उत्तम उपक्रम आहे. राज्याच्या कोनाकोपऱ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची माहिती लोकमतने आमच्यासमोर ठेवली. अनेक निकष आणि पडताळणी करून आम्ही विजेत्यांची निवड केली. ही निवड करणे इतके सोपे काम निश्चितच नव्हते.

अमित देसाई, वरिष्ठ वकील, मुंबई उच्च न्यायालयलोकमतचा हा उपक्रमत अत्यंत स्तुत्य आहे. विविध क्षेत्रांत लोकांनी केलेल्या कामगिरीचा विचार करत परीक्षक मंडळाने विजेत्यांची निवड केली आहे. केवळ परीक्षक मंडळ नव्हे तर सर्वसामान्य जनेतेने या पुरस्कारासाठी मतदान केले. खरे परीक्षक सर्वसामान्य जनता होती.

चेतना गाला सिन्हा, संस्थापक, माणदेशी महिला सहकारी बँकया परीक्षक मंडळात अतिशय दिग्गज लोकांचा समावेश होता. विविध पातळीवर किती प्रतिभावंत लोक काम करत आहेत, याची माहिती मला या निमित्ताने झाली. राज्याच्या विकासात या लोकांच्या कार्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या परीक्षक मंडळाचा मी एक भाग होते, हा माझा सन्मान आहे.

श्रेया घोषाल, लोकप्रिय पार्श्वगायिकाअतिशय विद्वान आणि उत्तुंग परीक्षक मंडळाचा मी एक भाग होतो, हा मी माझा बहुमान समजतो. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांत किती कमालीचे काम सुरू आहे, याची जाणीव मला झाली. चांगल्या लोकांचे चांगले काम समोर आणत लोकमतने एक सकारात्मकता पसरविण्याचे काम केले आहे, ते अतिशय विलक्षण आहे.स्वप्निल जोशी, अभिनेता

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटLokmatलोकमतpiyush goyalपीयुष गोयलVijay Dardaविजय दर्डाRishi Dardaऋषी दर्डा