शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: 'वैद्यकीय सेवे'साठी तुमचं मत कोणत्या डॉक्टरला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 17:13 IST

वैद्यकीय / उर्वरित राज्य या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. वैद्यकीय / उर्वरित राज्य या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

मणक्याच्या आजारांवर शस्त्रक्रियाविरहित उपचारडॉ. अजय कोठारी, ऑथोर्पेडिक सर्जन, पुणेडॉ. अजय रमेश कोठारी हे पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये ऑर्थाेपेडिक सर्जन आहेत. मणक्याच्या शस्त्रक्रियेमधील निष्णांत डॉक्टर म्हणून त्यांना १२ वर्षांचा अनुभव आहे. जगातील सर्वोत्तम स्पाइन सर्जनसोबतच सर्वोत्कृष्ट ऑथोर्पेडिशियन, ऑथोर्पेडिस्ट आणि स्पाइन सर्जन बनण्याची त्यांची इच्छा आहे. ते ऑथोर्पेडिक सर्जरी, स्पाइन सर्जरी या क्षेत्रात अद्ययावत आणि सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. स्पाइनल इंजेक्शन्स सर्व्हिकल आणि लंबर सिलेक्टिव्ह नर्व्ह रूट ब्लॉक, एपिड्युरल इंजेक्शन्स, मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरीमध्येही त्यांचा हातखंडा आहे. यालाच कीहोल स्पाइन सर्जरी म्हणूनही ओळखले जाते. डॉ. कोठारी यांनी पुणे विद्यापीठातून मेडिकल ग्रॅज्युएशन (एमबीबीएस) केले. त्यांनी संचेती इन्स्टिट्यूटमधून पीजी केले आहे.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

बायोडिग्रेडेबल स्टेंट वाढीसाठी प्रयत्नशीलडॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ, नागपूरडॉ. अमेय बिडकर यांनी हृदयविकाराचे समाजातील प्रमाण कमी होण्यासाठी हिमोहार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणे हे त्यांचे जीवनध्येय आहे. त्यासाठी शाळकरी मुलांपासून प्रत्येकासाठी हृदयाची काळजी आणि अचानक हृदयविकार आला तर काय करावे? असे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत दहा हजारांपर्यंत लोकांना शिक्षित केले आहे. बायोडिग्रेडेबल स्टेंटचा भारतात प्रसार व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत.  या स्टेंटसह अँजिओप्लास्टी सहसा कुणी करत नाही. शरीरात कायमस्वरूपी राहणाऱ्या पारंपरिक धातूच्या स्टेंटहूनही वेगळी स्टेंट आहे. कार्डिओलॉजीच्या क्षेत्रात यामुळे क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय नियतकालिकात २० पेक्षा जास्त संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

कॅन्सरमुक्तीसाठी झटणारा डॉक्टरडॉ. नीलेश चांडक, कॅन्सर तज्ज्ञ, जळगाव डॉ. नीलेश चांडक यांनी एप्रिल २०१० मध्ये त्यांनी जळगावमध्ये कॅन्सरच्या रुग्णावर उपचार करायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. जळगाव व अकोला येथील जिल्हा रुग्णालयात मोफत ओपीडी व शस्त्रक्रिया केल्या आहेत. एक हजारांपेक्षा जास्त ठिकाणी त्यांनी कॅन्सरविषयक जनजागृती शिबिर घेतली आहेत. त्यात कॅम्प, रोड शो, स्लाइड शोचा समावेश आहे. त्यांनी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले आहे. अंगणवाडीसेविका तसेच आशा स्वयंसेविका यांना कॅन्सरबाबत ट्रेनिंग दिले. एम्स हॉस्पिटल, जोधपूर येथे २०१९मध्ये इंडियन असोसिएशन ऑफ सर्जिकल ॲन्कॉलॉजीद्वारे बेस्ट सर्जिकल व्हिडीओ सन्मान, तसेच आरोग्य साधना पुरस्काराने गौरविण्यात आले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

युरेथ्रॉप्लास्टीचे काम भारतात वाढवायचेयडॉ. पंकज जोशी युरोलॉजिस्ट, पुणेगेली बारा वर्षे डॉ. पंकज जोशी या विषयात काम करत आहेत. त्यांना युरेथ्रॉप्लास्टी या मूत्रमार्गावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचे काम भारतात वाढवायचे आहे. युरेथ्रल स्ट्रीकचर वरील शस्त्रक्रिया (मूत्रमार्गात अरुंद होणे ) आणि इरेक्टाइल डिसफंक्शनवर उपाय म्हणून पिनाईल प्रोस्थेसिस या शस्त्रक्रिया ते करतात. या शस्त्रक्रिया देशात फार कुणी करत नाही. युरोकूल संस्थेत डॉ. जोशी रुग्णांवर उपचार करतात त्या ठिकाणी एम.यु.एच.एस. मान्यता असलेला या विषयावरील १ वर्षाचा फेलोशिप कोर्स शिकविला जातो. त्या शस्त्रक्रिया ते विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांनी आतापर्यंत रिकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजीच्या ८००० शस्त्रक्रिया केल्या आहेत. २३ देशात जाऊन त्यांनी व्याख्याने दिली. आंतरराष्ट्रीय नियतकालिकात १०८ संशोधनपर पेपर प्रसिद्ध केलेत.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

अणुतून आशेचा किरण दाखविणारे डॉक्टरडॉ. प्रफुल्ल जटाळे, न्यूक्लिअर मेडिसिन, छत्रपती संभाजीनगरन्यूक्लिअर मेडिसिन ही वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक शाखा. याच माध्यमातून शरीरातील अवयवांच्या आजारांची अचूक माहिती कळते. मराठवाड्यातील रुग्णांना यासाठी मुंबई, पुणे गाठावी लागत असे. डॉ. प्रफुल्ल जटाळे यांच्या रूपाने मराठवाड्याला पहिले न्यूक्लिअर मेडिसिनतज्ज्ञ मिळाले. महिन्याला ३०० रुग्णांच्या विविध अवयवांच्या आजारांचे अचूक निदान ते या माध्यमातून करीत आहेत. आजारांचे नेमके कारण कळण्यासाठी न्यूक्लिअर मेडिसिन दिशा देते. शहरात २०१३ मध्ये न्यूक्लिअर मेडिसिनतज्ज्ञ डॉ. जटाळे यांनी ही उपचारपद्धत सुरू केली. त्यामुळे मुंबई, पुण्याला जाणाऱ्या रुग्णांना शहरातच उपचार मिळतात. युरोपियन बोर्ड फेलोशिप इन न्यूक्लिअर मेडिसीन आणि डी. न्यूक्लिअर कार्डियोलॉजी मिळविणारे ते मराठवाड्यातील एकमेव डॉक्टर आहेत.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023