रत्नागिरीमधील सुद्धा पूल धोक्याचे असल्याचा इशारा ‘लोकमत’ने दिला होता
By Admin | Updated: August 3, 2016 21:46 IST2016-08-03T21:20:09+5:302016-08-03T21:46:31+5:30
बई - गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड - पोलादपूर दरम्यान सावित्रीनदीवरील ब्रिटीशकालीन पूल धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’ ने २०१३ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते.

रत्नागिरीमधील सुद्धा पूल धोक्याचे असल्याचा इशारा ‘लोकमत’ने दिला होता
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ३ - मुंबई - गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड - पोलादपूर दरम्यान सावित्रीनदीवरील ब्रिटीशकालीन पूल धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’ ने २०१३ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातीलही ब्रिटीशकालीन पूल धोकादायक असल्याचे वृत्तही ‘लोकमत’च्या २० मार्च २०१३ रोजी ‘हॅलो रत्नागिरी’मध्ये प्रसिद्ध केले होते. खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची आरामबस नदीत कोसळल्याची घटना १९ मार्च २०१३ रोजी घडली होती. त्यानंतर ‘लोकमत’ने ब्रिटीशकालीन पुलाच्या स्थितीबाबत प्रकाशझोत टाकला होता. ब्रिटीशकालीन पूल सुधारणार कधी, असा प्रश्न त्यावेळी ‘लोकमत’ने उपस्थित केला होता.