लोकमत शुभवर्तमान - माळरानावर पिकवली आकांक्षा काकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 08:54 IST2017-01-15T08:54:03+5:302017-01-15T08:54:03+5:30
कीकडे कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील अनियमतता असताना त्याच परिस्थितीत दुसरीकडे तालुक्यातील कैलास वाजे या खेडभैरव गावातील शेतकऱ्याने जिद्दीच्या बळावर दगडाळ

लोकमत शुभवर्तमान - माळरानावर पिकवली आकांक्षा काकडी
लक्ष्मण सोनवणे
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. 15 - एकीकडे कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील अनियमतता असताना त्याच परिस्थितीत दुसरीकडे तालुक्यातील कैलास वाजे या खेडभैरव गावातील शेतकऱ्याने जिद्दीच्या बळावर दगडाळ, मुरमाट पडीक अन दुर्लक्षित असलेल्या माळरानावर एक एकरच्या शेतीत बंगलोर येथील नेत्रा सिड्सची संकरित आकांक्षा या सुधारित वाणाची लागवड करून आधुनिक पद्धतीने काकडीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे.
यामुळे दररोज साठ ते सत्तर या काकडीच्या जाळ्या नाशिकला विक्रीसाठी ते नेतात. यातून त्यांना दररोज उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. त्यांनी बँगलोर येथील नेत्रा सिड्सच्या मदतीने किरण मांडे यांनी आधुनिक शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले असून ते शेतीबद्दलचे उपयुक्त असे ज्ञान त्यांना देत आहेत.या प्रयोगामुळे त्यांना विक्र मी उत्पादन मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. शेतीविषयक अभ्यास करून स्वत:च्या पोटच्या मुलासारखी काकडीची काळजी घेत त्यांनी निसर्गाच्या चहूबाजूने येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. गेल्या काही वर्षाच्या कालखंडात निसर्गाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नसतांना देखील त्यांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता ड्रीप पद्धतीने काकडी जगविली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात नक्कीच असतो. याप्रमाणे नवीन प्रयोगात त्यांची पत्नी वंदना देखील त्यांना सातत्याने मदत करीत असतात
इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभी असतांना तालुक्यातील या शेतकऱ्याने खचून न जाता डबघाईला आलेली कौटुंबिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भाजीपाला शेतीचा नवा पर्याय निवडला. अनेक पारंपारीक पिकांचे काटेकोर नियोजन करत नवनवीन प्रयोग केले. त्यातून आर्थिक घडी बसवली. त्यांच्या या प्रयोगाला यश आले. त्यामुळे इतर शेतकरीही आता त्यांची बाग पाहण्यासाठी रांगा लावत आहेत. वाजे यांच्या कष्टाला मिळालेली ती पावतीच आहे!
थंडीत देखील काकडीची वाढ झाली असून अनेक फुटवे आले आहेत. प्रत्येक फुटव्यांच्या पेर्यास फळे लागली असून वाजे यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे.नवीन तंत्रज्ञाणाचा अवलंब करीत ह्या जातीच्या काकडीची लागवड केली असून सेंद्रिय रबडी खतांचा वापर करून पिकांना जीवदान दिले आहे.या हिरवट पांढर्या काकडीला भरपूर फुटवे असून लंब दंडगोलाकार १६ ते १८ सेमी लांबीची फळे आलेली आहे. उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आहे.
- एकीकडे अस्मानीचा थैमान आणि दुसरीकडे नवनवीन सरकारी धोरणांची कात्री अशातच दलालांचे भाववाढीमागील धोरण यामुळे कोंडी होते. अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता अपयशाची कारणे देण्यापेक्षा मी शेतीविषयक अभ्यास केला आणि पडीक माळरानावर इतरांपेक्षा वेगळा विचार करत आकांक्षा काकडीचा नवीन प्रयोग यशस्वी केला; परिणामत: विक्र मी उत्पादनाने पुरेपूर उत्पन्न मिळत आहे.
- कैलास वाजे ,शेतकरी खेडभैरव