शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यास ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन’ची भूमिका महत्त्वाची असेल: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 11:32 IST

Devendra Fadnavis: भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यास ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन’ची भूमिका महत्त्वाची असेल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई: भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी लंडन येथे १८ ऑगस्ट रोजी आयोजित ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन’ची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

लंडन येथील सॅवाय हॉटेलमध्ये १८ ऑगस्ट रोजी लोकमत द्वितीय ग्लोबल कन्व्हेन्शन आयोजित करण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शनचे बोधचिन्ह आणि सन्मानचिन्हांचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झाले; त्यावेळी ते बोलत होते. जगातील सर्वोच्च  अर्थव्यवस्थांमध्ये भारताला सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी या कन्व्हेन्शनची मोठी मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. सन २०३० पर्यंत ते आम्ही पूर्णच करणार नाही तर त्याही पुढे जाऊ, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्त्वाचे कन्व्हेन्शन याप्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, छायाचित्रकार आणि चित्रकार सौ. रचना दर्डा उपस्थित होते. लंडनमधील ग्लोबल कन्व्हेन्शनला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्वीकारले. लोकमत समूहातर्फे आयोजित हे दुसरे कन्व्हेन्शन आहे. पहिले कन्व्हेन्शन सिंगापूर येथे आयोजित करण्यात आले होते. परकीय गुंतवणूक, उद्योगांमधील भागीदारी वाढविण्यासाठी अशा कन्व्हेन्शनची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, अनेक दिग्गज उद्योगपती आणि जाणकार यांच्यात उद्योगांसाठीचे सहकार्य आणि संकल्पनांचे आदान-प्रदान होते असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रावर फोकसया एकदिवसीय कन्व्हेन्शनमध्ये उद्योग, सरकार, राजकारण माध्यमे, समाजसेवा, मनोरंजन अधिक क्षेत्रांमध्ये प्रभावशाली व्यक्ती या आर्थिक सुधारणा आणि सहकार्य या विषयावरील चर्चेत सहभागी होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र साधत असलेली औद्योगिक प्रगती आणि देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान यावरही कन्व्हेन्शनचा फोकस असेल. लंडनच्या कन्व्हेन्शनमध्ये लोकमत भारतभूषण पुरस्कार, कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार, महाराष्ट्ररत्न पुरस्कार आणि लोकमत ग्लोबल सखी पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये विविध विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती आणि संस्थांचा समावेश असेल.

भारत: उभरता आर्थिक विश्वगुरू-आव्हाने आणि संधी ही या कन्व्हेन्शनची मुख्य संकल्पना असेल. भारताची वैभवशाली परंपरा, स्फूर्तिदायक वर्तमान आणि उज्ज्वल भवितव्य याचे प्रतिबिंब कन्व्हेन्शनमध्ये उमटेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमत