शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट ; तलवारीसह फोटोसेशन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 10:22 IST

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खुलेआम हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले.

औरंगाबाद – जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू असताना सुद्धा, पैठण तालुक्यातील भाजप विद्यार्थी मोर्च्याचे तालुका उपाध्यक्ष करण बोडखे यांनी वाढदिवस साजरा करत असताना खुलेआम तलवार हातात घेऊन फोटोसेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. याबाबत लोकमतमध्ये वृत्त येताच पोलीस प्रशासनाने या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे.पैठण तालुक्यातील भाजप विध्यार्थी  मोर्चाचे उपाध्यक्ष करण बोडखे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या फेसबुक पेजवर वाढदिवसाचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये वाढदिवस साजरा करत असताना, हातात तलवार असल्याचे फोटो सुद्धा पोस्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश देण्यात आलेला आहे. असं असतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खुलेआम हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले. याबाबतचे वृत्त लोकमत ने प्रकाशित करताच पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी बोडखे यांच्यावर वर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून तलवार जप्त करत अटक करण्यात आली आहे.करण बोडके या तरुणावर अवैधपणे शस्त्र बाळगणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक ही करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.                                                                           

ज्ञानेश्वर पायघन ( सहायक पोलीस निरीक्षक)भाजपकडून कारवाई नाहीच

भाजप हा गुंडाचा पक्ष असल्याचे आरोप नेहमीच विरोधक करत असतात. त्यातच औरंगाबादमध्ये शस्त्रबंदी लागू असतानाही, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनकडून हातात तलवार घेऊन फोटोसेशन करण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजप विध्यार्थी मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष करण बोडखे यांच्या हातात तलवार आणि बाजुला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे उभे असतानाचे फोटो बोडखे याने आपल्या फेसबुकवरून पोस्ट केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही, भाजपकडून त्या पदाधिकाऱ्यावर अजून कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, भाजप गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.